लासलगाव- लासलगाव ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार असून, या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. .माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. लवकरच नव्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. गेल्या २६ वर्षांपासून कार्यरत या रुग्णालयाने कोरोना काळातही उल्लेखनीय सेवा दिली. ऑक्सिजनची कमतरता असतानाही पहिल्या लाटेत ३५० रुग्णांवर यशस्वी उपचार झाले, तर दुसऱ्या लाटेत २४ तास सेवा देत ९०० रुग्णांवर उपचार करण्यात आले..रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, सेंट्रल ऑक्सिजन लाइन, व्हेंटिलेटर्स आणि १०२ रुग्णवाहिका सेवा कार्यरत आहेत. सध्या येथे २४ कर्मचारी कार्यरत असून, दोन वैद्यकीय अधिकारी आणि एक दंतचिकित्सक पद रिक्त आहे..वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात ३८ हजार ५०० रुग्णांची तपासणी झाली, तर अंतर्गत विभागात दोन हजार ९३४ रुग्णांवर उपचार झाले. ३६८ बाळंतपण, २५२ शस्त्रक्रिया, तर पाच हजार ७५९ रुग्णांनी एक्स-रे सुविधा घेतली. हीपॅटायटीस बी, रेबीज, पोलिओ, बीसीजी, स्नेक बाईट, टीटी, ASV, सोनोग्राफी आणि भूलतज्ज्ञ विभाग कार्यरत आहे. सर्व विच्छेदन कक्ष सुरू असून, ३० शवविच्छेदन झाले आहेत..रुग्णालयात काही सुविधांचा अभाव आहे. वाहनतळाची सुविधा नाही. पावसाळ्यात परिसर जलमय होतो. कंपाउंड नसल्याने अडचण येते. फक्त ९० बेडशीट असून, ३५० बेडची गरज आहे. इमारतीची देखभाल आवश्यक आहे. इमारतीचे प्लास्टर निघाले असून, रंग फिकट झाला आहे. स्लॅब गळतीचा त्रास आहे..‘ई-सुश्रुत’ अंतर्गत रुग्णांचा डिजिटल रेकॉर्ड ठेवला जातो. माता व बालक आरोग्य सेवेत लासलगाव रुग्णालय जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर आहे.डॉ. बाळकृष्ण अहिरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लासलगाव.अपघातानंतर रुग्णालयात दाखल झालो. मध्यरात्री डॉक्टरांनी तातडीने सेवा दिली. यामुळे धोका टळला.- शंकर पालवे, अपघातग्रस्त रुग्ण .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.