लामकानी- सैताळे (ता. धुळे) येथे मागील पाच दिवसांपासून बिबट्याने पशुधनाला लक्ष्य केले असून, रोज कुणाची गाय, बैल किंवा शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार होत आहे. सैताळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बिबट्या रोज रात्री शेतात बांधलेल्या पशुधनाला भक्ष्य करीत आहे.