बिबट्याने केले घोड्याला ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

निफाड : तालुक्यातील दिंडोरी तास येथे रविवार (ता. 3) रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याने मेढपाळांच्या शेतात बांधलेल्या घोड्यावर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे याबाबत वन विभागाने पंचनामा केला आहे. 

निफाड : तालुक्यातील दिंडोरी तास येथे रविवार (ता. 3) रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याने मेढपाळांच्या शेतात बांधलेल्या घोड्यावर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे याबाबत वन विभागाने पंचनामा केला आहे. 

वसंत सुकदेव गायकवाड (रा. आहेरवाडी, ता. येवला) हे मेंढपाळ दिंडोरी तासच्या गोदावरी डाव्या कालव्यानजिक यादव गणपत गांगुर्डे यांच्या शेतात तिनवारा पासुध मेंढ्या बसवल्या आहेत. शेजारच्या बाळासाहेब कदम यांच्या शेताता घोड्यांना चारण्यासाठी सोडलेले होते. मात्र रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास मेढपाळांची कुंत्री भुंकत आसल्यामुळे मेंढपाळ घोड्याच्या दिशेने धावले असता बिबट्या घोड्याव हल्ला करत असल्याचे दिसले. मात्र मेंढपाळांनी गागाट करुन बिबट्याला हुसकावले मात्र तोपर्यंत सदरचा बिबट्या ठार झाला होता याबाबत दिंडोरीच्या पोलिस पाटलांनी वन विभागाला कळवले असता, सोमवारी वन क्षेत्रपाल संजय भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक भैय्या शेख वनमजुर भारत माळी यांनी पंचनामा केला

मेंढपाळ ठरताहेत बिबट्यांचे लक्ष्य
निफाड तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात चारापाण्याची टंचाई भासु लागली की गोदाकाठ भागात नाशिकसह नगर जिल्ह्यातील मेंढपाळ गोदावरीच्या खोर्यात आपले बस्थान बसवतात  मोकळ्या शेतात हे मेंढपाळ आपला डेरा दाखल करत असल्याने या भागात सहज पणे शेळ्य मेंढ्या, घोडे यांच्यासह छोट्या बालकांवर हल्ला घडल्याच्या घटना घडल्या आहेत मागच्या महिण्यात करंजगावात बिबट्याच्या लहान मुलावर झालेला हल्ला भुसे , करंजगावात मेंढपाळाच्यांच घोड्यावर झालेले बिबट्याचे घोड्यावर झालेले हल्ले सर्वश्रुत असतांना पुन्हा ऐकदा बिबट्याच्या हल्यात घोडा ठार झाल्याने मेंढपाळांचे तांडे जणु बिबट्याचे लक्ष्य ठरु लागले आहे.

दरम्यान  दिंडोरीतास शिवारात ह्य झालेल्या बिबट्याच्या हल्यामुळे टोर वस्तीसह कालव्यानजिक राहणार्या नागरीकांनी सदरच्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे

Web Title: leopard kills horse in nifad