सावधान... परिसरात बिबट्या आहे!

दीपक कच्छवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

अन्  बिबट्याशी झाली नजरानजर...
वडगाव लांबे(ता. चाळीसगाव) शिवारात कुत्रा फस्त केल्यानंतर त्याच शिवारात सायंकाळी साडेसहा वाजता उसाच्या शेताच्या कोपर्‍यावर समाधान गायकवाड या तरुणाची बिबट्याशी नजरानजर झाली. मात्र सुदैवाने या तरूणावर बिबट्याने हाल्ला केला नाही.या तरूणाने पाच मिनिटे बिबट्याला पाहील्याचे त्याने सकाळ शी बोलतांना सांगितले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आठवड्यापूर्वी मेहुणबारे शिवारात आढळलेला बिबट्याने काल(ता.12) वडगाव लांबे(ता चाळीसगाव) येथे कुत्र्याला फस्त केले तसेच तरुणाची देखील बिबट्याशी नजरानजर झाली. परिसरात आढळलेल्या ठशांवरून वन विभागाने देखील बिबट्याचा अधिवास असण्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्या भागात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

वडगाव लांबे (ता.चाळीसगाव)  शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतक-यामध्ये भीती पसरली आहे.(ता.9) रोजी याच भागात सुभाष राजपुत यांच्या शेतातील मजुरांना बिबट्याने दर्शन दिले होते.आज सकाळी याच भागातील संजय बोलकर यांच्या शेतातील कुत्र्याला  बिबट्याने फस्त केल्याची घटना आज दुपारी दोनला उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.ह्या घटनेची माहीती कळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक संजय चव्हाण, प्रवीण गवारे, बाळू शितोळे, अजय मेहरे  यांनी परिसराची पाहणी केली तेथील वासुदेव देशपांडे यांच्या केळीच्या शेतात  बिबट्याच्या पायाचे ठसे, कुत्र्याच्या शरीराचा भाग मिळुन आला.त्यानंतर कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला असल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला.

ट्रॅप कॅमेरे लावले
येथील भागात ज्या ठिकाणी बिबट्याचा येण्या जाण्याचा मार्ग आहे. त्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.यापुर्वी येथे लावण्यात आल्याल्या कॅमेऱ्यात बिबट्या दिसला नसल्याचा खुलासा देखील वनविभागाने केला आहे.या शिवारात ठीक ठीकाणी वस्त्या असल्याने येथे रात्रीचा वीजपुरवठा द्यावा आशी मागणी शेतकरी करीत आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा लावण्यासाठी शेतकरी आग्रह करत आहेत.परंतु यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचा ठराव दिल्यावर आम्हाला येथे पिंजरा लावण्यात येईल आशी माहीती वनरक्षक संजय चव्हाण यांनी शेतकर्यांना दिली.तरी या भागातील बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे.

अन्  बिबट्याशी झाली नजरानजर...
वडगाव लांबे(ता. चाळीसगाव) शिवारात कुत्रा फस्त केल्यानंतर त्याच शिवारात सायंकाळी साडेसहा वाजता उसाच्या शेताच्या कोपर्‍यावर समाधान गायकवाड या तरुणाची बिबट्याशी नजरानजर झाली. मात्र सुदैवाने या तरूणावर बिबट्याने हाल्ला केला नाही.या तरूणाने पाच मिनिटे बिबट्याला पाहील्याचे त्याने सकाळ शी बोलतांना सांगितले.

Web Title: leopard seen in chalisgaon