Inspirational News : मराठे कुटुंबाची तिसरी पिढी राष्ट्रसेवेसाठी तत्पर! लेफ्टनंट सौरभचे चेन्नईत प्रशिक्षण पूर्ण

Grandfather Adv. Uttamrao Marathe, grandmother Kusum Marathe, father Brigadier Hitendra Marathe,
Grandfather Adv. Uttamrao Marathe, grandmother Kusum Marathe, father Brigadier Hitendra Marathe,esakal

Inspirational News : ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उत्तमराव मराठे यांचा नातू आणि ब्रिगेडिअर हितेंद्र मराठे यांचा मुलगा लेफ्टनंट सौरभ हितेंद्र मराठे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीत नुकतेच अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण करत सैन्यदलात राष्ट्रसेवेसाठी दाखल झाला.

पणजोबा दिवंगत वंजी नाना पाटील स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, वडील सैन्यदलात ब्रिगेडिअर, तर आता मुलगा लेफ्टनंट सौरभ यांच्या निमित्ताने छडवेल (प.) (ता. साक्री) येथील मराठे परिवारातील तिसरी पिढी राष्ट्रसेवेत दाखल झाली आहे. (Lieutenant Saurabh Hitendra marathe enlisted in Army for national service dhule news)

लेफ्टनंट सौरभने सुरवातीला औरंगाबाद येथील सर्व्हिसेस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूट येथून सेनादलातील अधिकारीपदाचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर इंजिनिअरिंगबरोबरच सेनादलासाठी अधिकारीपदाच्या परीक्षादेखील देत होता.

मागील वर्षी सौरभला एसएसबी उत्तीर्ण होण्यात यश आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीत प्रशिक्षणासाठी निवड झाली. या ठिकाणचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत आता तो देशसेवेसाठी सज्ज झाला आहे.

चेन्नई येथे नुकताच दीक्षान्त समारंभ सेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी लेफ्टनंट सौरभला कोर्समधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या दोन्ही समारंभांसाठी आजोबा ॲड. उत्तमराव मराठे व त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Grandfather Adv. Uttamrao Marathe, grandmother Kusum Marathe, father Brigadier Hitendra Marathe,
Inspirational Story हातगाडीवाला बनला करोडपती, फळ विक्रेत्याचा बिझनेसमन बनण्याचा यशस्वी प्रवास

वडिलांची प्रेरणा

साक्री तालुकाच नव्हे तर जिल्हाभरासाठी भूषणावह असे ब्रिगेडिअर हितेंद्र मराठे यांचा सौरभ हा मुलगा. अभियांत्रिकीनंतर परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध असतानाही त्याने देशप्रेमाने प्रेरित होऊन वडिलांप्रमाणे सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.

सेनादलातील अधिकारीपदाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सैन्यदलाची एसएसबी परीक्षा म्हणजे अतिशय कठीण निवडचाचणीत स्वतःची क्षमता व पात्रता सिद्ध करावी लागली.

त्यानंतर चेन्नई येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली. लेफ्टनंट सौरभ मराठे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे, साक्री पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, व्हिडिओकॉन कंपनीचे व्यवस्थापक हरिश्चंद्र मराठे आणि महेंद्र मराठे यांचा पुतण्या आहे. निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्याचे व कुटुंबीयांचे अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Grandfather Adv. Uttamrao Marathe, grandmother Kusum Marathe, father Brigadier Hitendra Marathe,
Inspirational News : परिस्थितीवर मात करत अंजलीताई बनल्या उद्योजिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com