Dhule Crime News : राईनपाडा सामूहिक हत्याकांडात 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; 5 भिक्षुकींनी गमावला होता जीव

देशभर गाजलेल्या या थरारक व संतापजनक घटनेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने सात जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सोमवारी (ता. ५) सुनावली.
Police taking life-imprisoned accused in the Rainpada murder case to the district jail.
Police taking life-imprisoned accused in the Rainpada murder case to the district jail. esakal

Dhule Crime News : मुलांना पळवून त्यांची किडनी काढणारी टोळी गावात सक्रिय असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील नाथपंथीय डवरी (गोसावी) कुटुंबातील पाच भिक्षुकींची राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे निर्घृण हत्या करण्यात आली.

देशभर गाजलेल्या या थरारक व संतापजनक घटनेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने सात जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सोमवारी (ता. ५) सुनावली. यातील एका आरोपीस सशर्त तात्पुरता जामीन मंजूर होता. त्याला शिक्षा झाल्याने पकड वॉरंट बजावण्यात आले आहे.

हत्या झालेल्या पाच जणांच्या कुटुंबाला पूर्वीच्या शासकीय पाच लाखांव्यतरिक्त आणखी मदत दिली जावी, असा आदेश देताना जिल्हा न्यायालयाने समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांना बळी पडून अशा घटना समाजात घडतात, त्या निंदनीय असून, समाजाने अशा अफवांना बळी पडू नये, असे मत निकालात प्रकट केले आहे.

काय आहे घटना?

राईनपाडा- घोटाळ आंबा येथे १ जुलै २०१८ ला भिक्षुकींचे हत्याकांड झाले. तेव्हा भिक्षुकी व्यवसाय करणारे हे कुटुंब सकाळी साडेनऊच्या सुमारास राईनपाडा येथे गेले. आठवडेबाजार असल्याने सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आली असल्याची अफवा प्रसारित झाली. त्यामुळे राईनपाडा येथील काही ग्रामस्थ आक्रमक झाले.

त्यांनी भिक्षुकी व्यवसायासाठी आलेल्या मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील पाच जणांना राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. कुठलेही म्हणणे न ऐकता त्यांना जमावाने दगड, विटा, दांडके, सळईसह विविध हत्यारानिशी बेदम मारहाण सुरू केली.

त्यात दुपारी साडेबाराच्या सुमारास दादाराव शंकरराव भोसले (वय ४७), भारत शंकर भोसले (४५), राजू रामा ऊर्फ श्रीमंत भोसले (४५), भारत शंकर माळवे (४५, रा. खवे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), अगनू श्रीमंत हिंगोले (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या पाच जणांची निर्घृण हत्या झाली.

Police taking life-imprisoned accused in the Rainpada murder case to the district jail.
Nashik Crime: दारुड्यांमध्ये वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात टाकली फरशी; जखमीचा मृत्यु, आरोपी ताब्यात

दोषारोपपत्र दाखल

या घटनेचे काही जणांनी मोबाईलवर चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केले. याच चित्रीकरणाची मदत घेत पोलिसांनी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक रवींद्र रणधीर यांनी फिर्याद दाखल केली.

राईनपाडा हत्याकांडातील घटनास्थळ पंचनामा तत्कालीन पोलिस अधिकारी सुनील भाबड यांनी केला होता. त्यांनी व्हिडिओ क्लिप तपासून संशयित गुलाब रामा पाडवी, दशरथ पिंपळसे, महारू पवार, युवराज चौरे यांची नावे निष्पन्न करून त्यांना आठ दिवस तपासातून गुजरात सीमेवरील जंगलातून अटक केली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात सरकार पक्षातर्फे ३३ साक्षीदार तपासण्यात आले.

सात जणांना जन्मठेप

साक्षी, पुरावे, व्हिडिओ क्लिप व आरोपींच्या कपड्यांवरील रक्‍ताच्या नमुन्यांआधारे जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. एफ. एम. एम. ख्वाजा यांनी महार ओंकार ऊर्फ वनक्या पवार (वय २१, रा. सावरपाडा, ता. साक्री), दशरथ ऊर्फ दशऱ्या काळग्या पिंपळसे (३५, रा. राईनपाडा), हिरालाल आत्माराम गवळी (१८), गुलाब रामा पाडवी (५५, रा. चौपाळे, ता. साक्री), युवराज गणू चौरे (३०, देवळीपाडा, ता. साक्री).

मोतीलाल काशीनाथ साबळे (२०, रा. निळीगोटी, ता. साक्री), काळू सोमा गावित (२५, रा. राईनपाडा, ता. साक्री) या सात आरोपींना दोषी धरत विविध कलमान्वये निरनिराळ्या शिक्षेपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावली. त्यातील आरोपी काळू सोमा गावित याला न्यायालयाने सशर्त तात्पुरता जामीन मंजूर केला होता. तो आता आढळून न आल्याने त्याच्या विरोधात पकड वॉरंट काढण्यात आले आहे.

Police taking life-imprisoned accused in the Rainpada murder case to the district jail.
Mumbai Crime: मुलुंडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये होत आहे वाढ !

विविध कलमान्वये शिक्षा

या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तवर, सहाय्यक सरकारी वकील गणेश पाटील यांनी सहकार्य केले. या घटनेचा तपास साक्रीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण अमृतकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश खटकळ, हवालदार ललित पाटील यांच्या पथकाने केला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, उपनिरीक्षक सत्तार मलिक, हवालदार मसूद शेख, हवालदार प्रवीण पवार, भायशी पावरा यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार लक्ष्मण कदम, सतीश पाटील यांनी कामकाज सांभाळले. जिल्हा न्यायालयाने सातही आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये एक ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीची वेगवेगळी शिक्षादेखील सुनावली आहे. खून, पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आदी कलमांखाली त्यांनी सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.

"समाज माध्यमांवर खोट्या बातम्या पसरत आल्याने जनतेत काय गैरसमज होऊ शकतात, हे या खटल्यात दिसून आले. चुकीच्या माहितीमुळे जनतेची मने कलुषित होतात. खोटी माहिती पसरल्याने जमावाने ग्रामपंचायत कार्यालयातच पाच भिक्षुकांना कोंडून मारहाण केली. यात पाच जणांचा जीव गेला. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तेच सात जण भिक्षुकांना काठी व गजांनी मारहाण करीत असल्याचे मोबाईल चित्रण व्हायरल झाले होते. त्याचा पुरावा म्हणून उपयोग झाला."- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

राईनपाड्यातील हत्याकांडावर दृष्टीक्षेप

- नाथपंथी डवरी समाजाच्या पाच भिक्षुकांना ठेचले

- ग्रामपंचायत कार्यालयातील घटनेमुळे सारेच हादरले

- दाखल ३६ पैकी २८ आरोपींना पोलिसांकडून अटक

- सप्टेंबर २०१८ ला ३५ जणांवर ९१७ पानांचे दोषारोपपत्र

- खटल्यातील तपासणीत पाच स्थानिक साक्षीदार फितूर

- सात आरोपींना जन्मठेप शिक्षा, तर २१ पैकी २० निर्दोष

- एक आरोपी राजाराम गावित याची कारागृहात आत्महत्या

Police taking life-imprisoned accused in the Rainpada murder case to the district jail.
Ahmednagar Crime: रक्षकच बनले भक्षक! अहमदनगरमधील धक्कादायक घटना, पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com