खंडणीप्रकरणी पोलिस अधिक्षक लोहार यांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांना 15 लाख रूपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

जळगाव : चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांना 15 लाख रूपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

लोहार यांनी चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. सध्या ते मुंबई गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. लोहार यांच्यासह त्यांचे साथीदार धीरज यशवंत येवले यांना जन्मठेप तर तिसरा आरोपी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्‍वास निंबाळकर यांना निर्दोषमुक्त करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश न्यायाधीश पी. वाय. लाळेकर यांनी आज दिले.

Web Title: Life Imprisonment to police superintendent Lohar