विद्यार्थ्यांसाठीच्या युट्युब चॅनलला मिळतेय पसंती

youtube
youtube

खामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर ता मालेगाव शाळेने  युट्युब चॅनल सुरु केला असून. त्यावरील व्हिडिओ विद्यार्थीही तयार करतात. यामध्ये शिक्षक भरत पाटील त्यांना मदत करत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले शैक्षणिक साहित्य हे आपल्या शाळेपुरते मर्यादित न राहता ते इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग व्हावा हा उद्देश ठेवूनच चॅनलची निर्मिती केली. यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता, पाठांतर केलेले निबंध, कृतीयुक्त गीते, यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांची स्वनिर्मित मराठी, इंग्रजीची सांकेतिक भाषा या साखळीचाही यात समावेश होतो. गणित, इंग्रजी, विज्ञान ,भाषा या विषयांच्या अध्ययन घटकानुरूप अश्या विद्यार्थ्यांच्या विचार प्रवृत्त व कल्पकतेतून विचारणा गती मिळावी व अध्ययन घटक सुलभ रित्या विध्यार्थ्यांना समजावा यासाठी या साहित्याची निर्मिती केली जाऊन ते साहित्य या चॅनलवर अपलोड केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेत व घरीही या चॅनलचा उपयोग अभ्यासासाठी करता येतो.

टयाबयुक्त असलेल्या माळीनगर शाळेचे विद्यार्थी स्वतः व्हिडिओ तयार करतात. त्यास उत्कृष्ट इफेक्टस देतात आणि आपल्या शिक्षकांच्या मदतीने अपलोड करतात. त्याच बरोबर कराओके माईकचा वापरही आता शाळेत होऊ लागला आहे. आवडलेले गीत गायल्यावर ते थेट यु ट्युबवर अपलोड केले जाते.

शाळेचा ज्ञानज्योती नावाचा शैक्षणिक ब्लॉग, फेसबुक पेज, शैक्षणिक ॲप्स आहेत. राज्य भरातील अनेक शिक्षक भरत पाटील यांच्या तंत्र्स्नेही ट्रिक्सचा वापर करून आपल्या अध्यापनात ह्या गोष्टींचा अवलंब करत असतात.

त्यांच्या nhttps://www.youtube.com/channel/UCF_vSA4wewVha5Uebg-OqsQ या शैक्षणिक यु ट्युब चॅनलला पाच लक्षाहून अधिक शिक्षक शिक्षणप्रेमी लोकांनी भेटी देत त्यांच्या शैक्षणिक अवलंब केला आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत भारत पाटील यांनी तयार केलेले अनेक व्हिडीओ महाराष्ट्र शासनाच्या दिक्षा ह्या अॅप वरती असून या अॅपच्या निर्मितीत भारत पाटील यांचा सहभाग होता. त्यांच्या या शैक्षणिक चॅनलच्या वापराणे राज्यभरातील शिक्षकांना फायदा होत आहे.
डॉ वैशाली झनकर प्राथमिक शिक्षणाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com