कर्ज प्रकरणात पतसंस्थेकडून पाळधीच्या शेतकऱ्याची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव - कर्ज घेतल्याच्या प्रकरणात २०११ मध्ये पन्नास टक्‍के भरले असून, यात हेराफेरी करून जमीन हडपण्याचा प्रयत्न पतसंस्थेने सुरू केला असल्याची तक्रार पाळधी (ता. जामनेर) येथील शेतकरी शिवाजी फकिरा पाटील याने केली आहे. 

जळगाव - कर्ज घेतल्याच्या प्रकरणात २०११ मध्ये पन्नास टक्‍के भरले असून, यात हेराफेरी करून जमीन हडपण्याचा प्रयत्न पतसंस्थेने सुरू केला असल्याची तक्रार पाळधी (ता. जामनेर) येथील शेतकरी शिवाजी फकिरा पाटील याने केली आहे. 

पाळधी येथील शेतकरी शिवाजी पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की २००८ मध्ये शिरसोली येथील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन यांनी पासबुक व चेकबुक मागून घेत परस्पर पैसे काढले आणि कर्जप्रकरणात फेरफार करून १६ लाखांचा दावा केला. दरम्यान, कर्जासाठी पाटील यांची १२ एकर जमीन तारण ठेवण्यात आली होती. १६ लाखांच्या दाव्याविरुद्ध पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाच्या आदेशानुुसार आठ लाख त्यांनी भरले. पतसंस्थेने तालुका उपनिबंधकांकडे २०१४ मध्ये धाव घेतली. त्यांनी १२ लाख वसुलीचा दाखला दिला. यानंतर पाटील हे पुन्हा उच्च न्यायालयात गेले. याबाबत ६ नोव्हेंबर २०१४ ला सदर दाखला रद्द करून तो जास्त केला असल्याचे मत देत नवीन दाखला द्यावा; असे आदेश न्यायालयाने दिले. यानुसार आता नवीन दाखल्यानुसार आपण पैसे भरण्यास तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान १२ एकर जमीन तारण ठेवली असताना ३२ एकर जमिनीवर कर्जापोटी बोजा लावण्यात आला. ही जमीन नुकतीच लिलावाद्वारे खरेदीचा देण्याचा प्रयत्न चालवला असता जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतल्यावर हा व्यवहार थांबला असून, आपणास न्याय मिळावा पूर्ण जमिनीवरील बोजा हटवावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Web Title: loan case credit society farmer cheating crime