कर्ज वितरणाची गती वाढविण्याची सूचना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्याचा 2019-20 साठी एक हजार 350 कोटी रुपयांचा संभाव्य कर्ज वितरण आराखडा तयार करण्यात आला आहे. या कर्ज वितरणासंबंधीची गती व कार्यवाही याबाबत काही मुद्दे वरिष्ठांनी उपस्थित करीत कर्ज वितरणाची गती वाढविली जावी, अशा सूचना नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापनातर्फे सर्व बॅंकांच्या संबंधितांना नुकत्याच एका बैठकीत देण्यात आल्या.

बॅंक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. नाबार्डतर्फे "संभाव्यता युक्त कर्ज योजना 2019-20'चे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Loan Distribution bank