हजार घरांमध्ये ‘श्‍यामची आई’ पोहोचविण्याचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

लोणखेडा (ता. शहादा) - साने गुरुजींना कृतिशील अभिवादन करण्याच्या हेतूने शहादा येथील युवकांनी एक हजार कुटुंबांत ‘श्‍यामची आई’ पुस्तक पोहोचविण्याचा संकल्प केला. 

लोणखेडा (ता. शहादा) - साने गुरुजींना कृतिशील अभिवादन करण्याच्या हेतूने शहादा येथील युवकांनी एक हजार कुटुंबांत ‘श्‍यामची आई’ पुस्तक पोहोचविण्याचा संकल्प केला. 

पूज्य साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेरच्या संलग्नीत शहादा केंद्राच्या युवा कार्यकर्त्यांनी साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्ताने येथील महात्मा फुले स्मारकावर अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा शाखेच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, राष्ट्रसेवा दलाचे राज्यमंडळ सदस्य कैलास भावसार, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा प्रधान सचिव खंडू घोडे, शाखा प्रधान सचिव संतोष महाजन, कार्यवाह राजेंद्र गुलाले, राजेंद्र शहा उपस्थित होते. 

यानिमित्ताने साने गुरुजी लिखित विविध गीतांचे गायन करण्यात आले. त्यानंतर संगीता पाटील, कैलास भावसार यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाचे राज्यमंडळ सदस्य कैलास भावसार यांनी साने गुरुजींनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या योगदानाचे माहिती दिली. राजेंद्र गुलाले यांनी समानतेची शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या विचारांचा आज समाजात पराभव होताना दिसत असल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर विनायक सावळे यांनी समाजाला आजही साने गुरुजींच्या प्रेम धर्माची आठवण करून देण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. धर्मेश मराठे व भूमि शहा यांनी सानेगुरुजी श्रमसंस्कार छावणी येथील विविध अनुभवाचे कथन केले.

त्यानंतर सर्वांनी गुरुजींना कृतिशील अभिवादन करण्याचा संकल्प करीत शहादा शहरात पुढील वर्षभरात शामची आई हे पुस्तके एक हजार कुटुंबात पोहोचविण्याचा संकल्प केला. वर्षभरात शहादा शहरात ही पुस्तके घरोघरी जाऊन पोहोचवतील. विपुल रोकडे, धर्मेश मराठे, भूमी शहा, वर्षा महाजन, भारती पवार, प्रवीण महीरे, आरीफ मण्यार, विजय बोढरे, गिरधर बिरारे, संतोष साळवे, प्रदीप केदारे, विक्की रोकडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: lonkheda nandurbar news shyamachi aai in 1000 home