धुळे, ता. २८ : श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेसच्या नावाने लकी ड्रॉचे आमिष दाखवून नागरिकांची तब्बल सात लाख ८० हजारांची फसवणूक करणाऱ्या चौघांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तथापि, चौघे फरारी होण्याचा प्रयत्नात असताना पश्चिम देवपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.