गोरक्षक शिर्केंची तडीपारी रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मालेगाव - सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला. शहरात गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्था धोक्‍यात येईल या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अहवालाआधारे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना 14 ऑगस्ट 2017 रोजी एक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश काढला होता. शिर्के यांनी या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात 24 ऑक्‍टोबर 2017 ला आव्हान दिले होते. याचिकेवर 20 एप्रिलला न्यायमूर्ती आर. एम. सावंत व न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Web Title: machindra shirke tadipar crime