Nashik News : व्यापाऱ्यांकडून लॉबिंगद्वारे द्राक्ष उत्पादकांचा घात! वातावरण बदलाचे फुसके कारण

grapes farming
grapes farmingesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वातावरण बदलाचे पारंपरिक आणि फुसके कारण सांगून द्राक्षाचे दर पाडून मागितले जात आहेत. ११० ते १३० रुपयांना चार किलोची पेटी मागून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.

हीच द्राक्षं बाजारात ७० ते १०० रुपये किलोने विकली जात आहेत. व्यापाऱ्यांच्या लॉबिंगने उत्पादकांचा घात केला आहे. (Grape growers ambushed by lobbying from traders Caused by climate change Nashik News)

नाशवंत माल असल्याने बळीराजा हतबल आहे. त्याला आधार देणारी व्यवस्था सरकारी पातळीवर नाही. राजकीय व्यवस्थेकडूनही याबाबत विचार होत नाही. शेतकरी संघटनादेखील बोलायला तयार नाहीत.

कुणाचे कुणाशी साटेलोटे आहे, हेही समजत नसल्याने चोरबाजार बोकाळला आहे. ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ असे म्हटले जाते. द्राक्ष उत्पादकाचे दुखणे कळण्यासाठी शिवारात बाग लावावी लागते.

नैसर्गिक संकट, असंख्य रोग, खत आणि औषधांचे वाढलेले दर, हातातोंडाशी घास आल्यानंतर पावसाची भीती, बाजार खुला झाल्यानंतर दर पाडून मागणारे व्यापारी... ही मालिका संपत नाही. त्यात दलालांनी खिसे भरून घेतले आहेत.

दलालांना गावात आणून त्यावरही दलाली मिळवणारे नवे दलाल तयार झाले आहेत. दोन्हींकडून लूट होतेय. यावर्षीही तेच नाट्य सुरू असल्याने शेतकरी संतापले आहेत. उत्तर भारतातील थंडी, पावसाच्या नावाखाली व्यापारी भाव पाडत आहेत.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

grapes farming
MLA Suhas Kande | करंजवन पाणीपुरवठा योजनेचे 13 फेब्रुवारीला भूमिपूजन : सुहास कांदे

नियंत्रण यंत्रणा हवीच..

द्राक्ष हे राज्यातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे सरकारने या एकूण व्यवस्थेत हस्तक्षेप केलाच पाहिजे. ऊसदराचे धोरण ठरवण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्या जसे काम करतात, तशीच यंत्रणा द्राक्षाबाबत उभी करावी लागेल.

कृषी विभागाचे कर्मचारी याकामी लावले पाहिजेत. व्यापारी लॉबी अनियंत्रित आहे. त्याविरोधात शासकीय पातळीवरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या पाहिजे. येत्या काळात हे घडले, तरच बाजार व्यवस्थेवर नियंत्रण राहील, अन्यथा दलालांची घरे भरली जातील आणि उत्पादकाच्या हाती कटोरा येईल.

grapes farming
Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेची खाते उघडण्याची विशेष मोहीम!

उत्पादन खर्च दुप्पट; दर मात्र जैसे थे

* गेल्या पाच वर्षांत द्राक्षाचा उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. कामगारांच्या पगारात मोठी वाढ झाली. औषधे आणि खतांचा खर्च प्रचंड होतोय. दुसरीकडे व्यापारी ज्या दराने द्राक्ष मागतात, तोच दर पाच वर्षांपूर्वी होता. या दराने द्राक्ष विकून शेतकऱ्याला स्वतः राबल्याची मजुरीही मिळत नाही.

"गेल्यावर्षी किमान ५० रुपये किलोच्या आत द्राक्ष विकायची नाहीत, असे संघाचे धोरण होते. व्यापाऱ्यांनी जास्तच लॉबिंग करून दर पाडले. शेतकऱ्यांनी शहाणपणाने व्यापाऱ्यांशी संवाद करावा. द्राक्षाचे क्षेत्र खूप वाढले आहे. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे."

-किशोर निफाडे, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक

"अत्यंत कमी दराने द्राक्ष मागून व्यापाऱ्यांनी खेळखंडोबा केला आहे. ते शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीही नाही, अशी परिस्थिती आहे."

-सुनील जाधव, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत

grapes farming
Nashik News: रस्ता हवाय मग, शासकीय फी भरा! मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना भूमी अभिलेख विभागाचा सल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com