Mahanatya Shivshahi : महानाट्यातून धुळ्यात अवतरणार शिवशाही! अलका कुबल शंतनू मोघेंची माहिती
धुळे : शहरात रविवार (ता. २६)पासून तीन दिवस देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनपटावरील विविध महान पैलूंवर प्रकाश टाकणारा ‘शिवशाही’ हा महानाट्याचा सोहळा पार पडणार आहे. (mahanatya shivshahi biography of Chhatrapati Shivaji Maharaj will be starting from 26 march in dhule news)
देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर २६ ते २८ मार्चला वीस वर्षांनंतर हा महानाट्याचा सोहळा धुळेकरांना पाहता येईल.
महानाट्याचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक महेंद्र महाडिक, मराठी सिनेतारका अलका कुबल-आठल्ये, छत्रपती संभाजी मालिकाफेम अभिनेते शंतनू मोघे, अमित देशमुख, महेश कोकाटे, रमेश रोकडे, महानाट्याचे प्रायोजक डॉ. सुशील महाजन, डॉ. निशा महाजन यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत प्रयोगाविषयी माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार जे इतिहासाच्या पानावर व कोणत्याही बखरीत ज्यांचा उल्लेख नाही, अशा शिलेदारांचा इतिहास महानाट्यातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न महानाट्याचे लेखक, निर्माते, दिग्नर्शक महेंद्र महाडिक यांनी केला आहे. रसिक प्रेक्षकवर्गाला व मैदानाचाच रंगमंच म्हणून या महानाट्यात वापर करण्यात आला आहे.
जिजाऊ व शिवबा असे महान कर्तृत्व पुन्हा जन्म घेणे शक्य नाही. मात्र, त्यांचे कलागुण हे प्रत्येकाच्या अंगाअंगात भिनावेत यासाठी जनतेने हे महानाट्य व त्याचा भव्यदिव्यपणा याचि देही याचि डोळा जरूर बघावा, असे आवाहन सिनेतारका कुबल यांनी केले.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
महानाट्याचे प्रायोजक डॉ. सुशील महाजन, डॉ. निशा महाजन आहेत. मराठी चरित्र अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये तब्बल १८ वर्षांनंतर मराठी रंगमंचावर महानाट्यात माँसाहेब जिजाऊ यांचे कणखर व्यक्तिमत्त्व साकारणार आहेत.
तसेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या दमदार भूमिकेतून घराघरांत पोचविणारे अभिनेते शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असतील. छत्रपतींचे विविध शिलेदार व मावळे यांचे दर्शन छत्रपती संभाजी मालिकेतील अनाजीपंत महेश कोकाटे, हिरोजी फरझन रमेश रोकडे, डॉ. राजेश आहेर, प्रकाश धोत्रे हे घडविणार आहेत.
महानगरीतील शंभराहून अधिक स्थानिक कलाकार या महानाट्यात सहभागी होऊन कलेचे सादरीकरण करतील. उपस्थितीचे आवाहन डॉ. महाजन, डॉ. विजय हिरे, अॅड. मयुरे बैसाणे, अॅड. प्रेम सोनार व विशाल चव्हाण यांनी केले.
पावसाचा व्यत्यय नाही : डॉ. महाजन
राज्यातील कृषी व हवामानतज्ज्ञ पंजाबराव डक यांच्याशी डॉ. सुशील महाजन यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला असता धुळे शहरात व जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही, असे समजले. हवामान व पावसाची चिंता न बाळगता धुळेकरांनी या महानाट्याचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.