Ramadan 2023 started from 24 march dhule news
Ramadan 2023 started from 24 march dhule news esakal

Ramdan 2023 : रमजान पर्वास सुरवात; मुस्लिम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण!

धुळे : शहरात शुक्रवार (ता. २४)पासून रमजान पर्वास (Ramadan 2023) सुरवात झाली. मुस्लिम समाजबांधवांनी रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चंद्रदर्शन झाल्याने गुरुवारी (ता. २३) रात्री विशेष नमाज तरावीहला सुरवात झाली. (Ramadan 2023 started from 24 march dhule news)

या वर्षी रमजानचा महिना पूर्ण ३० दिवसांचा आहे. शेवटचा रोजा २१ एप्रिलला असेल. त्यामुळे ईद ही २२ एप्रिलला साजरी केली जाईल. रमजान पर्वाच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

रमजान हा हिजरी (इस्लामिक कॅलेंडर)मधील नववा महिना आहे. इस्लाम धर्मातील कलमा, नमाज, रोजा, जकात, हज या पाच स्तंभांपैकी रोजा एक आहे. इस्लाम कालगणनेनुसार शाबान महिन्याच्या ऊर्दू २९ तारखेस चंद्रदर्शन होण्याची दाट शक्यता असते. दर्शन घडल्यास दुसऱ्या दिवसापासून रमजान पर्वास सुरवात होते.

बुधवारी शाबान महिन्याची ऊर्दू २९ तारीख असल्याने सर्वच मुस्लिम बांधवांनी सायंकाळी चंद्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. छत, टेरेस, उंच इमारती, मशीद परिसरात चंद्रदर्शनासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी पर्वाचा पहिला रोजा होता.

रोजा सहेरी आणि इफ्तारसाठी आवश्यक विविध वस्तू, खाद्यपदार्थ विक्री व्यावसायिकांकडून मौलवीगंज, देवपूर, वडजाई रोड, मोगलाई, चाळीसगाव रोड, आझादनगर, मच्छीबाजार भागांत दुकाने थाटली आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Ramadan 2023 started from 24 march dhule news
Nashik News: दोन दिवसांत अवकाळीचे पंचनामे पूर्ण - गंगाथरन डी

शहराच्या विविध मशिदींमध्ये तरावीहच्या विशेष नमाजानिमित्त स्वच्छता करण्यात आली. यंदा रमजान पर्वात पाच शुक्रवार येत आहेत, तर योगायोगाने शेवटच्या शुक्रवारी रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे. यामुळे मुस्लिम बांधवांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

रोजाची सुरवात सकाळी सूर्योदयापूर्वी फज्रच्या अजानसोबत केली जाते. या वेळी सहरी घेतली जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी जेवण केले जाते. यालाच सहरी म्हणतात. सहरी करण्याचा आधीच ठरविला जातो. दिवसभर न खाता-पिता रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी नमाजपठण केले जाते.

त्यानंतर खजूर खाऊन रोजा सोडला जातो. तो सायंकाळी सूर्यास्तानंतर सोडला जातो. यालाच इफ्तार म्हटले जाते. त्यानंतर सकाळी सहरीपूर्वी व्यक्ती काहीही खाऊ-पिऊ शकते. रमजानमध्ये सायंकाळी मगरीब नमाजाच्या वेळी इफ्तार केला जातो. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी इफ्तारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पेंडखजूर हमखास असतात. बाजारपेठेत प्रामुख्याने मुस्लिमबहुल भागात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.

Ramadan 2023 started from 24 march dhule news
Electricity Payment : सुटीच्या 2 दिवशी वीजभरणा केंद्र राहणारा सुरू!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com