Agriculture Officers
sakal
धुळे: शेतकऱ्यांची कामे अधिक जलद आणि अचूक पद्धतीने मार्गी लागावीत यासाठी शासनातर्फे ग्रामपातळीवर कार्यरत असलेल्या कृषी विभागातील तब्बल १३ हजार २७५ अधिकाऱ्यांना लवकरच अत्याधुनिक लॅपटॉप पुरवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे कृषी अधिकारी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची सर्व ऑनलाइन कामे पूर्ण करू शकतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे तालुका किंवा मंडळ कार्यालयात जाण्याचे हेलपाटे वाचण्यास मदत होऊ शकेल.