esakal | लेंडी-शाकंबरी नदीला पूर; भुसावळ-मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

लेंडी-शाकंबरी नदीला पूर; भुसावळ-मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी

लेंडी-शाकंबरी नदीला पूर; भुसावळ-मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरु सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल पासून सुरू असलेला पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे सुरू होता परिणामी लेंडी व शाकांबरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज आलेला नव्हता. लोहशिंगवे वालूर व मोरझर या क्षेत्रात प्रचंड मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने लेंडी व शाकंबरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. दहेगाव नाका गुलजारवाडी भागातील नागरिकांची घरे पाण्याखाली येवून दोन फुटाएवढे पाणी या भागातील घरात घुसले. सुदैवाने अद्यापही नुकसान नाही. दुसरीकडे लेंडी नदीच्या पाण्याला वाट मिळाली नाही. परिणामी लेंडी नदीवरील सबवे ते रेल्वे स्थानकापर्यंत भुसावळ मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी झाले. रेल्वे स्थानकावर पाणी पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनीमंदीर परिसरातील लेंडी शाखाबंरी नदी पात्र दुथडी भरुन वाहू लागल्याने हायवेवरील वाहतूक बंद पडली. नागरिकांनी मध्यरात्री उशिरापर्यंत नदीपात्रांवर गर्दी केली. शहरातील बाजारपेठेतील मध्यवर्ती भाग आसलेला गांधीचौकात दोन फुट पाणी होते. आपत्ती व्यवस्थापन बघणारी शासकीय यंत्रणेतील विविध खातेप्रमुख नेहमीप्रमाणे मुख्यालयात नसल्यामुळे त्यांच्या स्तरावरील उपाययोजना कळायला मार्ग नव्हता.

loading image
go to top