Maharashtra Student Innovation Challenge: नंदुरबारला महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज! स्टार्टअपला पाठबळ

संस्थांनी १५, तर युवकांनी ३१ पर्यंत ऑनलाइन सहभाग नोंदवावा
Maharashtra Student Innovation Challenge
Maharashtra Student Innovation Challengeesakal
Updated on

: महाराष्ट्र राज्य नावीन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सहभागासाठी संस्थांनी १५ ऑगस्ट व युवकांनी त्यांच्या संबंधित संस्थेमार्फत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (Maharashtra Student Innovation Challenge to Nandurbar Support for startups nandurbar)

यात सहभागी होण्याकरिता www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करता येणार आहे.

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा तरुण उद्योजकांचा शोध घेऊन त्यांची स्टार्टअपची स्वप्ने साकारण्यासाठी संभाव्य पाठबळ देण्याचा एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्था व विद्यार्थी या इनोव्हेशन चॅलेंजकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात महाराष्ट्र राज्य नावीन्यता परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात नावीन्यता परिषदेमार्फत सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra Student Innovation Challenge
Tomato Rates Hike: टोमॅटोने बनविले चक्क करोडपती, लखपती! डोंगरकुशीत वसलेल्या धुळवडकरांचे कष्ट

देशातील युवकांमधील सर्जनशीलता विकसित करून त्यांच्यातील प्रतिभेच्या माध्यमातून नवनिर्मिती करणे, त्याकरिता पोषक वातावरण तयार करणे, नवनवीन कार्यपद्धती, निर्मिती पद्धती, वितरणप्रणाली या बाबींच्या अंतर्भावासह गमिमान व संवेनदशील पद्धतीने व्यवस्थापन, शासन व्यवस्था निर्माण करणे व त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चॅलेंजमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.

Maharashtra Student Innovation Challenge
Girish Mahajan: मागचे काय यापेक्षा पुढे चांगले काम करा : मंत्री गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MSRTC Student Pass
Admission Confusion to End as Maharashtra Sets Up District-Level Student Help Centers
Minor student blackmail case in Maharashtra
Nagpur Hostel Row
Marathi News Esakal
www.esakal.com