चोपडा मतदारसंघात सेनेने गड राखला; लता सोनवणे विजयी : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

चोपडा ः राज्यातील दहाव्या क्रमांकाच्या विधानसभा (अ. ज.) मतदारसंघ असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात या पंचवार्षिकमध्ये अटीतटीच्या लढतीत सेनेने गड काबीज करीत मताधिक्‍य घेत यश मिळवले. विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यात प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी महायुती व शिवसेनेच्या लताबाई चंद्रकांत सोनवणे या 20 हजार 529 इतके मताधिक्‍याने विजयी झाल्या. 

शिवसेनेच्या लताबाई चंद्रकांत सोनवणे यांना 23 व्या फेरीअखेर पोष्टल मतदानासह 78 हजार 137 तर राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र वळवी 58 हजार 608 हे दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे 32 हजार 459 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मतमोजणीत एकूण 23 फेऱ्या करण्यात आलेल्या होत्या. पहिल्या फेरीपासून ते बाराव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादी आघाडीवर होती. त्यानंतर तेराव्या फेरीपासून सेनेने आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम राहिली. सेना व राष्ट्रवादी व बंडखोर अपक्ष यांच्या काट्याच्या लढतीत शिवसेना ही यशस्वी ठरली आहे. पोष्टल बॅलेट मतदानातही 107 मते सेनेला जास्त मिळाली. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष करीत विजयी उत्सव साजरा केला आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जास्त मताधिक्‍य घेत विजय मिळवला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results chopda sena lata sonawane win

टॅग्स
टॉपिकस