जळगाव शहर : आमदार भोळे 64 हजारांनी विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

जळगाव : जळगाव शहर मतदार संघात झालेल्या विधानसभा निवडणूकीत आज उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी 64 हजार 846 चे मताधिक्‍क्‍य घेवून दणदणीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा पराभव केला. 

जळगाव : जळगाव शहर मतदार संघात झालेल्या विधानसभा निवडणूकीत आज उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी 64 हजार 846 चे मताधिक्‍क्‍य घेवून दणदणीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा पराभव केला. 
जळगाव शहर मतदार संघातील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते अशी ः विजयी-आमदार सुरेश भोळे (भाजप) मते-1 लाख 13 हजार 310, पराभूत-अभिषेक पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)-48 हजार 464, अपक्ष-शफी अ.नबी शेख-6 हजार 330. जळगाव शहर मतदार संघात सर्वात कमी मतदान झाले होते. यामुळे उमेदवार आमदार भोळे व राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या तीव्र चूरस होईल असे चित्र होते. कमी मतदानाचा निकालावर प्रभाव पडू शकतो असे सर्वच राजकीय नेते गृहीत धरीत होते. मात्र जळगाव शहर मतदार संघात आमदार भोळेंना पहिल्या फेरीपासून 3 हजारांचा लीड होता. तो वाढत वाढत 64 हजारांपर्यंत पोचला. 

4998 मतदारांचा "नोटा' 
जळगाव मतदार संघात 3 जार 998 मतदारांनी "नोटा' बटून दाबून मतदारांना नाकारले आहे. 211 मत अवैध ठरली आहेत. एकूण 1 लाख 82 हजार 338 मतदान झाले होते. अकरा उमेदवारांच्या अनामत रक्कम झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results jalgaon city MLA bhole win