Dead Body Found Near Tarkedha Railway Track : तारखेडा शिवारातील रेल्वेमार्गालगत गटारीत सापडलेला ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; पाचोरा पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
पाचोरा- तारखेडा (ता. पाचोरा) शिवारातील रेल्वे मार्गावर सुमारे ४५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सोनवणे यांनी मेमो दिला.