भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडूनच दाखवा : मुख्यमंत्री ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुक्ताईनगर : ज्यांच्यासोबत तीस वर्षे होतो, त्यांनी विश्‍वास दर्शविला नाही. पण, ज्यांच्याविरोधात पंचवीस वर्षे संघर्ष केला, त्यांनी एका दिवसात विश्‍वास दर्शविला. म्हणून महाविकास आघाडीचे सरकार बनले. भाजपनेते दररोज सरकार पडेल, अशा वल्गना करीत आहेत. मात्र, त्यांनी उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवावे, असे जाहीर आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. 

क्‍लिक करा - शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढणार : मुख्यमंत्री ठाकरे 

माजीमंत्री तथा भाजपचे नेते एकनाथराव खडसेंच्या मुक्ताईनगरात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. 
श्री. ठाकरे म्हणाले, गोरगरिबांच्या उद्धारासाठी, शेतकऱ्यांच्या व पर्यायाने राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे हे सरकार त्यामुळेच मजबूत आहे. कुणीही कितीही भाषा वापरली तरी आम्हाला धोका नाही. भाजपवाले "ऑपरेशन लोटस' राबवीत असल्याची चर्चा आहे. त्यांना काय राबवायचे ते राबवू द्या, आम्ही अभेद्य व मजबूत आहोत, असे ते म्हणाले. 
शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही प्राथमिक योजना आहे. यापुढे आता दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aaghadi goverment cm udhav thakrey muktainagar farmer mela and bjp challenge