शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढणार : मुख्यमंत्री ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

जळगाव ः शेतकरी हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जातून मुक्‍त करण्यासाठी पाऊल उचलत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रथमोचार असून, शेतकऱ्यांना या कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढण्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे. हा प्रयत्न पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी आणखी उपाय योजना केले जातील असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. 

जळगाव ः शेतकरी हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जातून मुक्‍त करण्यासाठी पाऊल उचलत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रथमोचार असून, शेतकऱ्यांना या कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढण्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे. हा प्रयत्न पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी आणखी उपाय योजना केले जातील असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. 

क्‍लिक करा - राज्याच्या विकासाला केंद्राकडून मदत नाही,संसदेत मांडणार प्रश्‍न : शरद पवार

जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कृषीमंत्री दादा भूसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे एकाच वेळी स्वागत करण्यात आले. 

हेपण वाचा - यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी : कृषिमंत्री दादा भुसे

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की पवार- ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी; याचा अर्थ महाविकास आघाडीत अंतर नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता असल्याने त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाऊल उचलणार असल्याचे देखील ते म्हणाले. भविष्यात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्‍यकता असून, हे तंत्रज्ञान जैन इरिगेशन विकसीत करत असल्याने शेतकऱ्याने या तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक होईल; अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. 

राज्याच्या प्रत्येक भागात पाणी पोहचवा : शरद पवार 
देशाच्या प्रगतीचे श्रेय जितके वैज्ञानिकांना आहे तितकेच श्रेय काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला देखील आहे. कृषी क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना देखील शेतकरी हा मेहनत करत असतो. शेतकऱ्याच्या मेहनतीला मदतीची जोड मिळाली तर आणखी प्रगती करू शकेल. तसेच राज्यातील मराठवाडा, खानदेश तहानलेला असून, केंद्र व राज्य सरकाने महाष्ट्राच्या प्रत्येक भागात पाणी पोचविण्याचे काम करावे; असे मत शरद पवार यांनी यावेळी मांडले. 

केळी संशोधन केंद्राकडे वर्ग करा : पालकमंत्री पाटील 
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. देशातील केळीच्या उत्पादनापैकी सर्वाधिक 20 टक्के उत्पादन जिल्ह्यात होत आहे. तेलबिया संशोधन केंद्राची 100 एकर जमीन उपलब्ध असून ती केळी संशोधन केंद्राकडे वर्ग करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon maharashtra state cm uddhav thackeray farmer karjmukti