महिंद्रा कंपनीत चक्क 'इतका' बोनस!

सतीश निकुंभ : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीमुळे महिंद्रावर अवलंबून आसलेल्या शेकडो कंपन्यांवर व त्यामध्ये काम करणा-या हजारो कामगारांना फटका बसत आहे तर बाॅशसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यानी वेतन करार करण्यास नकार देऊन एक प्रकारे नकारात्मक घंटा वाजल्याने औद्योगिक क्षेत्रातुन नाराजीचा सुर पाहायला मिळत होता. अशा वातावरणातही महिंद्रा एंड महिद्रा कंपनी व्यवस्थापनाने एक पाऊल सकारात्मक पुढे टाकत या वर्षीचा बोनस बाबत युनियन पदाधिकारीशी चर्चा करून कंपनीतील विविध विभागातील उत्पादनावर बोनस जाहीर केला आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील सातपूर येथील महिंद्रा कंपनीचा कमीतकमी ३५ हजार व जास्तीतजास्त एक लाख सहा हजार एवढ्या रकमेचा बोनस जाहीर करण्यात आल्याचा दावा करत युनियन अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी सागितले 

मंदीने बेजार झालेल्या व्यापारी वर्गालाही दिलासा ​

दरम्यान ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीमुळे महिंद्रावर अवलंबून आसलेल्या शेकडो कंपन्यांवर व त्यामध्ये काम करणा-या हजारो कामगारांना फटका बसत आहे तर बाॅशसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यानी वेतन करार करण्यास नकार देऊन एक प्रकारे नकारात्मक घंटा वाजल्याने औद्योगिक क्षेत्रातुन नाराजीचा सुर पाहायला मिळत होता. अशा वातावरणातही महिंद्रा एंड महिद्रा कंपनी व्यवस्थापनाने एक पाऊल सकारात्मक पुढे टाकत या वर्षीचा बोनस बाबत युनियन पदाधिकारीशी चर्चा करून कंपनीतील विविध विभागातील उत्पादनावर आधारीत कमीतकमी ३५ हजार पासून ते सर्वात जुन्या कर्मचारी कामगारला एक लाख सहा हजार रूपये बोनस जाहीर केल्याने कामगार वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे बोनस व पगार मिळून जुन्या कामगारांच्या हातात दिड लाखा पेक्षा जास्त रक्कम पडणार आहे.  यामुळे नाशिकच्या बाजारात खरेदीची गर्दी वाढणार आसून काहीसे मंदीने बेजार झालेल्या व्यापारी वर्गालाही दिसला मिळण्यास मदत होणार आहे. या वर्षीचा औद्योगिक क्षेत्रात मंदीचे सावट असताना सर्वात जास्त बोनस जाहीर केल्याचा दावा युनियन पदाधिकारी केला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahindra Company Announces Bonus