प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करणार - चंद्रकांत पाटील

प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करणार - चंद्रकांत पाटील

जळगाव - शासनाला जीएसटी आणि प्राप्तिकराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 2022 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर या निधीतून शासन देशातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करण्यासाठी पैसा खर्च करेल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

"शासन सध्या अनेक लोकोपयोगी योजनांवर पैसा खर्च करीत आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे स्रोतही बळकट करत आहे. जीएसटी, आयकर यांतून उत्पन्न येते. देशात अगोदर साडेतीन कोटी लोक कर भरत असत. मात्र, आता त्यांत वाढ झाली असून, तब्बल सात कोटी लोक कर भरत आहेत. त्यामुळे शासनाला यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाने देशातील जनतेला पायाभूत सुविधा देण्याचे काम वेगाने सुरू केले. या वर्षअखेर महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असतील. प्रत्येकाला पक्के घर मिळालेले असेल. तसेच, धरणाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे 2022 पर्यंत या सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या असतील. शिल्लक निधीतून मग जनतेला श्रीमंत करण्यासाठी शासनास पैसा खर्च करता येईल.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com