Mosquito Problem : डास प्रतिबंधासाठी शासकीय कार्यालयांना पत्र; मनपा मलेरिया विभागातर्फे कार्यवाही

mosquitoes
mosquitoes esakal

Mosquito Problem : पावसाळ्यात डास, कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपापल्या कार्यालयात डास प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवा, असे सूचनावजा आवाहनाचे पत्र महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे शहरातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना देण्याची कार्यवाही सुरू आहे. (Malaria dept of Municipal Corporation has issued letter of appeal to implement mosquito prevention measures dhule news)

महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून व आयुक्तांच्या स्वाक्षरीने शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना पत्र देत डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सांगण्यात येत आहे. मॉन्सून कालावधीत डासांची पैदास व त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होत असते.

आपल्या कार्यालयाच्या ठिकाणीसुद्धा डासांची पैदास होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी या काळात डासांच्या व कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यालयात आणि कार्यालयाच्या परिसरात डास प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात, असे पत्रात नमूद केले आहे.

या उपाययोजना करा

कार्यालयाच्या गच्चीवरील कचरा/पन्हाळी यांची स्वच्छता करावी जेणेकरून गच्चीवर पाणी साठून राहणार नाही, कार्यालयाच्या गच्चीवरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, त्यांना घट्ट झाकणे बसवावे, गच्चीवर व परिसरात टायर, फुटके डबे, भंगार साहित्य, प्लॅस्टिक पिशवी, चहाचे प्लॅस्टिक कप इत्यादी अनावश्यक साहित्य/कचरा असल्यास त्यांची विल्हेवाट लावावी, कूलरमधील पाणी काढून टाकावे तसेच फ्रीजचा डीफ्रास्टिंग ट्रे स्वच्छ करावा, सांडपाण्यासाठी आवश्यक असल्यास शोषखड्डे बनवावेत, शौचालयाच्या व्हेंटपाइपला जाळी अथवा कापड बांधावे, कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

mosquitoes
Mosquito Problem: धक्कादायक! कूलर लावू नका नाहीतर डासांची पार्टी सुरु होईल तुमच्या घरात...

ही सर्व कार्यवाही आपल्या कार्यालयस्तरावर त्वरित करण्यात यावी ज्यातून डास व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी करता येणे शक्य होईल, असे पत्रात नमूद केले आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून असे पत्र शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना दर वर्षी दिले जाते. मात्र, याबाबत संबंधित कार्यालयांकडून किती कार्यवाही होते याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

आजही अनेक शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये, आवार व परिसरात मोठ्या प्रमाणावर अडगळीचे साहित्य पडलेले पाहायला मिळते. अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसते. महापालिकेच्या या पत्राच्या निमित्ताने का होईना या कार्यालयांनी स्वच्छता राखून, डास उत्पत्तीस्थळे नष्ट करून सहकार्य करण्याची गरज आहे.

mosquitoes
Soap Attracts Mosquito : खरं की काय! डास केवळ माणसांचीच नाहीतर साबणाचीही पप्पी घेतात? संशोधकांनीच शोध लावलाय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com