मालेगाव महापालिका आयुक्तपदी ऋचेश जयवंशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नाशिक / मालेगाव - महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतानाच आज येथील आयुक्त रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून ऋचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे. जयवंशी हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात प्रकल्प संचालक होते. नाशिकचे महसूल उपायुक्त डॉ. संजय कोलते यांची जळगावऐवजी नागपूर येथे मनरेगा आयुक्‍तपदी बदली झाली आहे. 

राज्यातील आयएएस दर्जाच्या अकरा अधिकाऱ्यांच्या आज बदल्या झाल्या आहेत. यात जयवंशी यांची मालेगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. श्री. जगताप यांचे बदलीचे ठिकाण अद्याप निश्‍चित नाही. वर्षापूर्वीच जगताप यांची येथे बढतीवर नियुक्ती झाली होती. त्यांनी महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. ठेकेदारांच्या बिलांचे धनादेश वशिल्याऐवजी क्रमांकनिहाय अदा करण्याचा निर्णय घेतला. घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला. त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता ठेकेदार वॉटरग्रेसच्या कामकाजात शिस्त लागली. स्वच्छता विभागाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल झाली. वैयक्तिक शौचालय, घरकुल या कामांच्या पूर्ततेसाठी त्यांनी परिश्रम घेतले. मात्र कचरा कुंड्यांची खरेदी, गोशाळा पांजरपोळच्या नाल्याजवळील अतिक्रमण यावरून त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यावरून त्यांच्याबद्दल सत्तारुढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत महापालिका कार्यालयात बदली आदेश प्राप्त झालेला नव्हता. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना श्री. जगताप पदभार सोडणार की काय व जयवंशी येथे तातडीने दाखल होणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. आज सायंकाळनंतर शहरात सर्वत्र याच वृत्ताची चर्चा होती. श्री. जगताप यांनी या वृत्तास दुजोरा दिला नाही. आपणाला अद्याप बदलीचा आदेश प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. कोलते नागपूरला 
नाशिकचे महसुल उपायुक्त डॉ. संजय कोलते यांची नागपूर यथे मनरेगा आयुक्‍तपदावर, तर मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी ऋचेश जयवंशी यांची बदली झाली आहे. डॉ. कोलते यांची दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली होती. त्यानंतर आज पुन्हा नव्याने त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. डॉ. कोलते यांनी नाशिकला बरीच वर्ष काम केले आहे. गतिमान व पारदर्शी काम करून चांगला ठसा उमटविला आहे. 

Web Title: Malegaon new municipal commissioner