महापालिकेतील सत्तारुढ कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर आंदोलनाची वेळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मालेगाव - शहर हागणदारीमुक्त झाल्यानंतर स्वच्छतेचा बोजवारा उडाला. शहराचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच गटारी, शौचालय, स्वच्छ ठेवावेत, वॉर्ड क्रमांक 12, सर्व्हे नंबर दहा येथील शौचालय तोडफोड झाल्यानंतर तेथे पूर्ववत सार्वजनिक शौचालय बांधावेत, संथ गतीने व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी यांसह विविध मागण्यांसाठी कॉंग्रेसतर्फे बुधवारी (ता. 17) महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

सत्तारुढ गटावरच वारंवार आंदोलन करण्याची वेळ येत असल्याने हा विषय शहरात चर्चेचा ठरला आहे. शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते साबीर गोहर, हाफिज अन्सारी, माजी नगरसेवक अश्‍पाक अहमद आदींच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात नियमित स्वच्छता, किदवाई रस्ता दुभाजकाचे काम संथ गतीने होत असल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे, अतिक्रमण मोहिमेत बेरोजगार झालेल्यांना पर्यायी जागा देणे, नवीन सार्वजनिक शौचालय बांधणे, विकासकामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे नगरसेवक अस्लम अन्सारी यांनीही धरणे आंदोलन केले. आजच्या धरणे आंदोलनात जैनुल पठाण, जमाल सय्यद, पप्पू अलाऊंसर, इब्राहिम दादामियॉं, अजगर अन्सारी, जाबीर सुरमेवाले, एजाज अहमद, रफीक खान, सिद्दीक हाजी आदींसह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी दैनंदिन स्वच्छतेची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. 

Web Title: malegaon news congress malegaon municipal