मालेगाव महापौरपदी  काँग्रेसचे रशीद शेख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मालेगाव - यंत्रमागनगरी असलेल्या मालेगावच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची प्रत्येकी ४१ मते मिळून बहुमताने निवड झाली. महापालिका स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपद मिळाले आहे. शेख यांनी मालेगाव महागटबंधन आघाडीचे उमेदवार नबी अहमद अहमदुल्ला यांचा, तर घोडके यांनी मन्सूर अहमद यांचा पराभव केला. ‘एमआयएम’ या निवडणुकीत तटस्थ राहिले, तर काँग्रेस व शिवसेना यांची युती झाली होती.

महापौर, उपमहापौर या दोन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. त्यांच्या विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. श्री. शेख हे मालेगावचे सातवे महापौर आहेत. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकराला विशेष सभा झाली. महापौर-उपमहापौरपदासाठी हात उंचावून मतदान झाल्यानंतर त्यांनी दोघांच्या बहुमताने निवडीची घोषणा केली. प्रथम महापौरपदासाठी व त्यानंतर उपमहापौरपदासाठी मतदान झाले. महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू स्थितीमुळे महापौर-उपमहापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच होती. काँग्रेस-शिवसेना युती झाल्याने त्यांचे पारडे जड होते. ‘एमआयएम’ तटस्थ राहिल्याने काँग्रेस-शिवसेना युतीला सत्ता संपादन करणे सुलभ झाले. 

शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपद 
उपमहापौर निवडीवेळी छाननीनंतर भाजपचे सुनील गायकवाड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सखाराम घोडके व आघाडीचे मन्सूर अहमद यांच्यात लढत झाली. महापौर निवडीत आघाडीबरोबर असलेल्या भाजपने उपमहापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. श्री. घोडके यांना ४१, तर मन्सूर अहमद यांना फक्त २७ मते मिळाली. यामुळे श्री. घोडके यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली.

Web Title: malegaon news congress mayor