मालेगाव शहरातील उड्डाणपूल निविदा उघडल्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

मालेगाव - शहरातील जुन्या महामार्गावरील मुख्य अग्निशामक दल कार्यालय ते सखावत हॉटेलदरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलासाठीच्या निविदा आज उघडण्यात आल्या. दाखल चार निविदांपैकी आर. ई. इन्फ्रास्ट्रक्‍टरने सर्वांत कमी दराने 21 कोटी 72 लाखांची निविदा दाखल केली आहे. ही निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी सांगितले. 

महापालिका कार्यालयात आज निविदा समितीच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात आल्या. आर. ई. इन्फ्रास्ट्रक्‍चर (ठाणे) यांची निर्धारित दराची निविदा होती. हर्ष कन्स्ट्रक्‍शनची (नाशिक) 13.50 टक्के जादा दराची, ए. बी. वाघ (धुळे) यांची 10.29 टक्के जादा दराची व बी. आर. भदाणे (धुळे) यांची 9.9 टक्के जादा दराची अशा चार निविदा होत्या. यातील आर.ई.च्या निविदेला समितीने मंजुरी दिली. या वेळी श्री. बच्छाव, उपायुक्त अतुल गायकवाड, सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, लेखापरीक्षक कमरुद्दीन शेख, बांधकाम उपअभियंता संजय जाधव आदी उपस्थित होते. 504 मीटर लांबीचा व 12 मीटर रुंदीचा हा पूल साकारणार आहे. आमदार आसिफ शेख यांनी या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. दोन महिन्यांपूर्वी ई-प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे उद्‌घाटन केले. पूल साकार झाल्यास जुना महामार्ग, बसस्थानक, मच्छीबाजार, पिवळापंप भागातील रहदारीची कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. 

Web Title: malegaon news flyover Tender