मंजुषा शेवाळे हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सटाणा : येथील मविप्र संचालित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील मंजुषा शेवाळे या विद्यार्थीनीने नंदुरबार येथे झालेल्या विभागीय 'फ्री स्टाईल कुस्ती' स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. येत्या 28 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मंजुषाची निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेत मंजुषा शेवाळे हिने प्रथम तर कल्याणी यशवंते हिने द्वितीय क्रमांक मिळविला. अत्यंत खडतर परिस्थितीत मंजुषाने हे यश मिळविले असून तिला महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक डी. एम. राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे, प्राचार्या एस. बी. मराठे यांच्या हस्ते मंजुषाचा सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपमुख्याध्यापक बी. ए. निकम, उपप्राचार्य सुरेश भामरे, के. एस. हिरे, डी. जे, गायकवाड आदींसह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: manjusha shevale selected for state level wrestling