मनमाड बालसुधारगृहातील मुलावर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मनमाड - येथील बालसुधारगृहात सात वर्षीय मुलावर हंगामी कर्मचारी संजय पोटिंदे याने अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सात वर्षीय मुलगा बालसुधारगृहात असताना तेथेच काम करणारा कर्मचारी संजय विठ्ठल पोटिंदे (रा. मुरलीधरनगर, मनमाड) हा या मुलाला सतत त्रास देत होता. पोटिंदेने त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. झालेला प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी त्याला धाक दाखविला जायचा. त्यामुळे हा मुलगा भीतीपोटी व दडपणाखाली होता; पण अत्याचाराचा त्रास वाढतच गेल्याने त्याने सोमवारी रात्री पुन्हा असा प्रकार घडल्यानंतर सकाळी कामावर आलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला हा प्रकार सांगितला. या कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारी पाटील यांना याची माहिती दिली. घडलेला प्रकार गंभीर असल्याने पाटील यांनी काल येथे भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली. त्या मुलाची वैद्यकीय तपासणी केली असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास येताच त्याच्या उपस्थितीतच बालसुधारगृहाचे लिपिक मिखिल लक्ष्मीकांत स्वर्ग (वय 38) यांनी या प्रकरणी मनमाड पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानंतर पोलिसांनी संशयित संजय पोटिंदे याला अटक केली. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचारासंदर्भात असलेल्या "पोक्‍सो'सह लैंगिक अत्याचारासंदर्भातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: manmad nashik news Child abuse at school