Nandurbar News : मनुमाता बहुउद्देशीय संस्थेची एकाकडून 18 लाखांची फसवणूक

Money Fraud News
Money Fraud Newsesakal

आमलाड : तळोदा येथील मनुमाता बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवाने १७ ते १८ लाखांत संस्थेची व देणगीदारांची फसवणूक केल्याने त्यांच्यावर तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुमाता बहुउद्देशीय संस्था, तळोद्याचे संचालक योगेश प्रभाकर चौधरी (वय ४६, धंदा- शेती/व्यापार) व संस्थाचालक (रा. कल्पना टॉकीज, तळोदा) यांच्या फिर्यादीनुसार तळोदा येथील मनुमाता बहुउद्देशीय संस्थेचे दीपक केशवलाल चावडा (४०, धंदा- व्यापार/शेती, रा. कॉलेज रोड, तळोदा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. (Manumata Multi Purpose Institute Eighteen lakh fraud by one case has been filed against former secretary in Taloda police station Nandurbar News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Money Fraud News
Jalgaon News : गोद्रीची पाणी, रस्ते, आरोग्याची समस्या सुटली

त्यांनी संस्थेचे सचिव असताना स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेची व देणगीदारांची १७ ते १८ लाखांची फसवणूक केली. संशियत आरोपी संस्थेच्या २०१५ ते २०२० दरम्यान सचिव म्हणून काम करीत असताना त्याने देणगीदारांकडून येणाऱ्या देणग्यांच्या हिशेब ठेवणे, संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार, मूळ दप्तर, संस्थेचे प्रोसिडिंग बुक, दैनंदिनी, संस्थेचे व्यवहार त्या त्या रजिस्टरमध्ये नोंदणीचे काम करीत असताना, संस्थेने त्याला कुठलाही हक्क व अधिकार दिलेला नसताना भूलथापा व खोटी आश्वासने, विश्वास संपादन करून देणगीदारांकडून सुमारे १७ ते १८ लाख रुपये रक्कम स्वीकारली.

आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या खात्यात जमा न करता महत्त्वाचे दस्तऐवज, देणगी पुस्तके, प्रोसिडिंग बुक वगैरे इतर मौल्यवान कागदपत्रे कब्जात ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून संस्थेची व देणगीदारांची फसवणूक केली. तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल तपास करीत आहेत.

Money Fraud News
NMU Election News : विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार जाहीर, प्रचार सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com