Maratha Kranti Morcha : मराठा आंदोलनाची धग कायम सोयगावच्या कार्यकर्त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न 

प्रमोद सावंत
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मालेगाव - शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेले आंदोलन व चक्का जाम शांततेत पार पडले. मात्र आंदोलनाची धग आजही कायम आहे. सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव आदींसह सहा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी टेहरे चौफुलीजवळील एकलव्य पुलाजवळ गिरणा नदीपात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या कार्यकर्त्यांना तातडीने नदीपात्रातून बाहेर काढले. आज शुक्रवारी सकाळी श्री. बच्छाव व सहकाऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरवात केली. दहा दिवसापूर्वीच त्यांनी तशी घोषणा केली होती. या वेळी एकलव्य पुलावर मोठा जलसमुदाय जमला होता. आंदोलनकर्त्यांना नदीपात्रातून बाहेर काढल्यानंतर नायब तहसिलदार एम. एस. कारंडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारत तुमच्या भावना शासनापर्यंत पोहचवू असे आश्‍वासन दिले. उपअधिक्षक अजित हगवणे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. श्री. बच्छाव, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव, देवा पाटील, प्रशांत उर्फ पिंटू जाधव, भूषण बच्छाव, दिलीप बच्छाव, सोनू बच्छाव हे आज सकाळी जलसमाधीसाठी गिरणा नदी पात्रात उतरले हाेते. यावेळी अग्निशामक दलाचे दोन बचाव पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.

या आंदोलनास ॲड. आर. के. बच्छाव, निखील पवार, भरत पाटील, रामा देवरे, डॉ. किशोर जाधव, पंडीत जाधव, अशोक बच्छाव, कैलास बच्छाव, नंदू बच्छाव, राजू सूर्यवंशी, दिलीप बच्छाव, चिंधा बच्छाव, योगेश बच्छाव, बबन बच्छाव, शाम बच्छाव, सदानंद बच्छाव, भैय्या बच्छाव, लकी चिकनवाले, रहीम शेख, अमित बच्छाव, संजय महाले, रवी सूर्यवंशी आदींसह बहुसंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते

Web Title: Maratha Kranti Morcha : Maratha Movement, Soygaon activists suicidal attempt