नांदगावात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नांदगाव शहरात व साकोरा गावात चांगला प्रतिसाद मिळाला नांदगावला कडकडीत बंद पाळण्यात आला तर साकोरा गावात रास्तारोको करण्यात आले बोलठाणला मोर्चा काढीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. 

नांदगाव -  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पडसाद आज नांदगाव शहर, साकोरा बोलठाण येथे उमटलेत. नांदगावला कडकडीत बंद पाळण्यात आला तर साकोरा येथे रास्तारोको करण्यात आला बोलठाणला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. नांदगाव शहरात व साकोरा गावात चांगला प्रतिसाद मिळाला नांदगावला कडकडीत बंद पाळण्यात आला तर साकोरा गावात रास्तारोको करण्यात आले बोलठाणला मोर्चा काढीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. सकाळपासूनच नांदगाव शहरातील दुकाने बंद होती दवाखाने, भाजीपाला व काही फळविक्रेते हा अपवाद वगळता नांदगाव बंद ला शंभर टक्कर प्रतिसाद मिळाला व्यापाऱ्यांनी देखील आपले व्यवहार थांबवून बंदमध्ये सहभाग दिल्याने तो कडकडीत बंद पाळण्यात झाले. बंद काळातच सकल मराठा बांधवानी शहरातील प्रमुख रस्त्याने मूक मोर्चा काढून बंदचे आवाहन केले होते.

या दरम्यान बंद काळात समाज बांधवानी शहरात मोर्चा काढत निषेध नोंदवला. त्यांनतर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस आवारात जाऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले प्रभारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे पोलिस निरीक्षक बशीर शेख मोर्चेकरी समाजबांधवांना सामोरे गेले व त्यांनी निवेदन स्वीकारले. सरकार व मराठा आमदार, खासदार यांनी मराठा आरक्षणावर आक्रमक होऊन मराठा समाजाला व काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला न्याय द्यावा असे या आवाहन समाजातर्फे या निवेदनात करण्यात आले. तत्पूर्वी उपस्थितांनी दिवंगत काकासाहेब शिंदे यांना पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. माजी आमदार अॅड. अनील आहेर, संजय पवार, माजी सभापती विलासराव आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, राजाभाऊ देशमुख, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कवडे, आप पार्टीचे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले डॉक्टर प्रभाकर पवार कुणाल आहेर,महेंद्र जाधव, विठ्ठल गरूड, विक्रांत कवडे, मनोज झेंडे, समाधान खैरणार, उदय पाटील, भगवान पाटील, आकाश पाटील, भैय्यासाहेब आहेर यासह मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव उपस्थित होते. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Maharashtra Band nandgaon