esakal | बसस्‍थानकावर बसलेल्‍या वृद्धास चिरडले
sakal

बोलून बातमी शोधा

accident

दोंडाईचाकडे जाणाऱ्या पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफा रस्त्यावरून वळविण्यात आला होता. अपघाताची घटना मंगळवारी (ता. २६) दुपारी चारच्या सुमारास घडली होती.

बसस्‍थानकावर बसलेल्‍या वृद्धास चिरडले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडाकडून भरधाव वेगाने दोंडाईचाकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने चिलाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळील बसस्थानकावर वृद्धास जोरदार धडक दिली. त्यात त्‍याचा मृत्यू झाला. याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दोंडाईचाकडे जाणाऱ्या पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफा रस्त्यावरून वळविण्यात आला होता. अपघाताची घटना मंगळवारी (ता. २६) दुपारी चारच्या सुमारास घडली होती.

पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित व उपअधीक्षक अनिल माने यांनी चिलाणे येथील ग्रामस्थांची समजूत काढून रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिलाणे येथील कौतिक कडु पाटील (भामरे, वय ६०) गावातील बसस्थानक जवळ रस्त्यावरील डाव्या बाजुने दोंडाईचाकडे पायी फिरण्यासाठी जात असताना त्यांना शिंदखेड्याकडून दोंडाईचाकडे भरधाव वेगाणे येणाऱ्या माल ट्रक (एम एच १ ९ झेड १५८५ ) हिने मागून जोरात धडक दिली व त्यात त्यांना डोक्यास तसेच शरीरावर इतर ठिकाणी मार लागून गंभीर दुखापत झाली. त्यांना धिरेंद्र पाटील आदी ग्रामस्थांनी घटनास्थळांवरून खासगी वाहनाने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. ट्रक चालक संतोष कुबेर यादव (वय ४५ वर्षे रा.संजय मैदाण कामटी रोड़ नागपुर) यांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत वळवी करीत आहेत.