esakal | ११ मार्च आता हा दिवस म्‍हणून ओळखला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse

सह्याद्री वाहिनीवर रोज एक तास अहिराणी कार्यक्रम असावा, खानदेशला शासनदरबारी कान्हदेश असा उल्लेख व्हावा, कान्हदेशातील अनुशेष शासनाने लवकरात लवकर भरून काढावा,

११ मार्च आता हा दिवस म्‍हणून ओळखला जाणार

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : आहिर गुराखी राजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिन ११ मार्च जागतिक आहिराणीदिन साजरा करणे, अहिराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा, महाविद्यालयीन शिक्षणात अहिराणी विषय ऐच्छिक विषय ठेवावा, अहिराणी वाङ्‌मयाला शासकीय पुरस्कार द्यावा, साहित्य संमेलनास कायमस्वरूपी अनुदान द्यावे, अहिराणी नाट्य स्पर्धेत अनुदान सुरू करावे, अहिराणी ॲकॅडमी स्थापन करून दर वर्षी दहा कोटींचे अनुदान द्यावे, भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे, जनगणनेत मातृभाषा अहिराणी म्हणून स्थान द्यावे, खानदेशातील आकाशवाणी केंद्रावरून अहिराणी कार्यक्रमाचे रोज प्रसारण व्हावे, सह्याद्री वाहिनीवर रोज एक तास अहिराणी कार्यक्रम असावा, खानदेशला शासनदरबारी कान्हदेश असा उल्लेख व्हावा, कान्हदेशातील अनुशेष शासनाने लवकरात लवकर भरून काढावा, हे ठराव एकमताने सोमवारी (ता. २८) ऑनलाइन विश्व अहिराणी संमेलनात मंजूर करण्यात आले. हे ठराव उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप आहिरे यांनी मांडलेत. 

विश्‍व अहिराणी संमेलनाचे सूप वाजले 
प्रा. फुला बागूल यांनी विविध विषयांवर समीक्षा मांडली. संस्कृतींन्या वाटा यात खानदेशातील विविध नृत्य प्रकार सादर झाले. सुनीता बोरसे यांनी पहिले अहिराणी दिंडीगीत गायिले. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी देश-विदेशातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. प्रा. रत्ना चौधरी यांनी महिलांना रोजगार देऊन स्वावलंबी करण्यासाठी विचारधारा मांडली. सिनेनिर्माते तथा गीतकार प्रकाश पाटील यांनी अहिराणी चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांच्या समस्या मांडल्या. अमेरिकेतील डॉ. पोपटराव पाटील यांची मुलाखत ऑस्ट्रेलियातून राजीव बेडसे यांनी घेतली. कृषिभूषण विश्वासराव शेळके- पाटील यांनी आधुनिक कृषितंत्राची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात कथाकथन झाले. सुनील गायकवाड यांनी बाडगीनी धार, प्रा. वाल्मीक अहिरे यांनी अहिराणी आन्हा, रामदास वाघ यांनी दुष्काय, एम. के. भामरे यांनी ‘घरन घरपन नी तरुनसन वर्तन’ ही कथा सादर केली. नरेंद्र खैरनार यांनी आधुनिक अहिराणी व संजय गिरासे यांनी अहिराणी लिखाणातील आव्हाने यावर विचार मांडले. आशादेवी पाटील यांनी खानदेशी खाद्यसंस्कृतीतील चटकदार चविष्ट पदार्थांची कथारूप माहिती दिली. ‘आयत पोयत संख्यान’ हे एकपात्री नाटक प्रवीण माळी यांनी सादर केले. दरम्यान, संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी अध्यक्षीय भाषण अस्सखलित अहिराणीत करून दाद मिळविली. स्वागताध्यक्ष विकास पाटील यांनी अथक १५ दिवसांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे सांगत संमेलनाचा समारोप केला. 

तीन दिवस आणि साडेसतरा तास 
संमेलन तीन दिवस साडेसतरा तास चालले. देशविदेशातील तीनशे साहित्यिक व कलावंत सहभागी झाले. एक लाख दर्शकांनी आनंद लुटला. मंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी आभार मानले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image