esakal | Bird flu alert पक्षी मृत आढळले तर येथे साधा संपर्क; परस्‍पर विल्‍हेवाट नको
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu alert

बर्ड फ्लू रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नये. जिल्ह्यात कुठेही कुक्कुट पक्षी अथवा कावळा, बगळे, पोपट, स्थलांतरित पक्षी मृत आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी अथवा अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

Bird flu alert पक्षी मृत आढळले तर येथे साधा संपर्क; परस्‍पर विल्‍हेवाट नको

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : जिल्ह्यातील कोणत्याही गावामध्ये कुक्कूटपक्षी, कावळे, पोपट, बगळे अथवा स्थलांतरित पक्षांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. मृत पक्षांना हात लावू नये, शवविच्छेदन करू नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. 
धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. मात्र, या आजाराच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येत आहे. १२ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन संबंधित विभागांना आवश्‍यक सूचना देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागामार्फत १८ रॅपिड रिस्पॉन्स टिम (जलद प्रतिसाद पथके) तयार करण्यात आली आहेत. 

यांच्याशी साधा संपर्क 
बर्ड फ्लू रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नये. जिल्ह्यात कुठेही कुक्कुट पक्षी अथवा कावळा, बगळे, पोपट, स्थलांतरित पक्षी मृत आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी अथवा अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. संपर्क क्रमांक असे ः जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष धुळे (०२५६२-२८८०६६/८७८८७६२८७१), जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय धुळे (९०२९५१३१८२), वनविभाग (टोल फ्री क्रमांक १९२६), पशुधन विकास अधिकारी धुळे (९४२१६१७७५५), साहाय्यक आयुक्त शिंदखेडा (९८२२८९२९५४), पशुधन विकास अधिकारी शिंदखेडा (७०८३७१९३३७), साहाय्यक आयुक्त शिरपूर (९८८१०९७३२३), पशुधन विकास अधिकारी शिरपुर (९४०३२४३२२५), साहाय्यक आयुक्त साक्री (९७३०५४२१४४), पशुधन विकास अधिकारी साक्री ( ९४२१५३७३४५), साहाय्यक आरोग्य अधिकारी, मनपा धुळे (९४२२७८६४०८) 
 
अंडी, मांस शिजवून खा 
अंडी व कुक्कुट मांस किमान ७० ते ८० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने, शिजविलेली अंडी व कुक्कुट मांस खाणे पूर्णतः: सुरक्षित आहे. मांस विक्रेत्यांनी व पोल्ट्री फार्मवर काम करणा-या कामगारांनी मास्क व हातमोजे यांचा वापर करावा. तसेच कोंबडीचे उर्वरित अवशेष (पिसे, पाय, पोटातील अनावश्यक अवयव आदी) यांची योग्य विल्हेवाट लावावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे