esakal | जावयाचा शोध सुरू..कारण जावयाचा कारनामाच आहे तसा; सासऱ्यासोबत काय केले वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

car robbery

खानदेशात शिरपूरसह काही भागात त्यांचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी शिरपूरहून कामाचे सहा लाख रुपये घेऊन ते त्यांचे जावई उमेश मगन मोरे (वय ३२, रा. येवला) याच्यासह कार (एमएच १५, बीएन ८०५५)ने येवल्याला जात होते.

जावयाचा शोध सुरू..कारण जावयाचा कारनामाच आहे तसा; सासऱ्यासोबत काय केले वाचा

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : कारमध्ये हवा भरून येतो, असे निमित्त करून जावयानेच सासऱ्याची इनोव्हा कार व कारमधील पाच लाख २० हजार रुपये पळवून नेल्याची घटना येथे शुक्रवारी (ता. १२) दुपारी घडली. कार रात्री दोनला चोपडा (जि. जळगाव) येथे सापडली. या प्रकरणी सासऱ्याने जावयाविरुद्ध फिर्याद दिली आहे. 
सासरा भाईदास कांतिलाल चव्हाण (रा. येवला, जि. नाशिक) खडीकामाचे ठेकेदार आहेत. खानदेशात शिरपूरसह काही भागात त्यांचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी शिरपूरहून कामाचे सहा लाख रुपये घेऊन ते त्यांचे जावई उमेश मगन मोरे (वय ३२, रा. येवला) याच्यासह कार (एमएच १५, बीएन ८०५५)ने येवल्याला जात होते. दरम्यान, सावळदे फाट्यावर चव्हाण यांनी एका नातेवाइकाला ८० हजार रुपये दिले. 

जेवणासाठी थांबले अन्‌ केला कारनामा
दुपारी दोनला सोनगीर फाट्यावर हॉटेल स्वागतमध्ये जेवणासाठी थांबले. तेव्हा जावई उमेश सासऱ्याला ‘तुम्ही जेवणाची ऑर्डर द्या, मी बाथरूमला जातो,’ असे सांगत तेथून निसटला व कारसह पैसे घेऊन तो पसार झाला. सायंकाळ होईपर्यंत चव्हाण यांनी वाट पाहिली मात्र जावई न आल्याने सोनगीर पोलिस ठाणे गाठले व जावई उमेशविरुद्ध पाच लाख २० हजार व दीड लाखाची कार अशी सहा लाख ७० हजार रुपयांची चोरी केल्याची फिर्याद दिली. 

सीसीटीव्ही फुटेजवरून शोध
सीसीटीव्ही फुटेजवरून मार्ग काढत कार व एक मोबाईल कारमध्ये सापडला. अवघ्या आठ तासांत पोलिसांनी कार शोधली. दरम्यान, जावयाचा शोध सुरू आहे. हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image