धुळे जिल्ह्यात चना खरेदीचे दर निश्‍चित; शेतकऱ्यांची नोंदणीला सुरवात

निखील सुर्यवंशी
Monday, 15 February 2021

चना खरेदीसाठी केंद्र सरकारने नाफेड/ भारतीय अन्न महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. नाफेड/ भारतीय अन्न महामंडळातर्फे राज्यात पणन महासंघामार्फत चना खरेदी केली जाईल.

धुळेः आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२०- २०२१ मध्ये चनाची हमी भावाने खरेदी होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन धुळे व नंदुरबार जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले. 

चना खरेदीसाठी केंद्र सरकारने नाफेड/ भारतीय अन्न महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. नाफेड/ भारतीय अन्न महामंडळातर्फे राज्यात पणन महासंघामार्फत चना खरेदी केली जाईल. त्यासाठी केंद्राने सरकारने चना (एफएक्यू) दर प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपये निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी एफएक्यू प्रतीचा म्हणजे काडीकचरा नसलेला, चाळणी करून सुकवून स्वच्छ माल विक्रीस आणावा. 

ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी
ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. चना उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर चना विक्रीसाठी नोंदणी करता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, चालू हंगामाचा पीकपेरा नोंद असलेला ऑनलाइन सातबारा उतारा व खाते चालू असलेले बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून एसएमएस पाठविण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना विशिष्ट तारखेला एसएमएस प्राप्त झाला त्यांनी दिलेल्या तारखेला चना विक्रीस आणावी. 

येथे साधा संपर्क
नोंदणीचे ठिकाण असे (अनुक्रमे नोंदणीचे ठिकाण, संपर्क सेवकाचे नाव व मोबाईल क्रमांक) : धुळे तालुका खरेदी- विक्री आणि प्रक्रिया सोसायटी, धुळे, स्वप्निल देवरे, ८८८८० ८८४८३, शिरपूर तालुका सहकारी खरेदी- विक्री सोसायटी लिमिटेड शिरपूर, दर्शन देशमुख, ९४२२१ २३९२९, शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ दोंडाईचा, भगवान पाटील, ९२८४४ २९८७७, शेतकरी सहकारी संघ, साक्री, भगवान ठाकरे, ९३५६८ ५६०५२, ९०१११ ४०७६३. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news chana purchase rates fixed farmer online ragistestion