esakal | पेट्रोल- डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

dhule congress

पेट्रोल- डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

sakal_logo
By
टीम ई सकाळ

साक्री (धुळे) : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे (Petrol diesel price) सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी; यासाठी शहरातील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्यावतीने (Dhule congress) निषेध आंदोलन करण्यात आले. दरवाढी विरोधातील मागणीचे निवेदन नायब तहसीलदार अंगद असटकर यांना तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली साक्री तालुका काँग्रेसच्यावतीने आज देण्यात आले. (dhule-news-congress-strike-petrol-diesel-price)

निवेदनात म्हटले आहे, की केंद्रातील मोदी सरकारने (prime minister narendra modi goverment) पेटोल, डिझेल व एलपाजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार कला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही दरवाढ अशीच चालू राहिली; तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. तसेच स्वयंपाक गॅस हि ९०० रुपये झाला आहे. यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल- डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.

हेही वाचा: प्रगल्भतेच्या प्रसंगाला ‘राजकीय फोडणी’ नको!

काँग्रेसच्या काळात सामान्यांना होता दिलासा

केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस प्रणित युपीएचे सरकार असतांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या असतांना देशांतर्गत पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवर त्याचा परिणाम होवू दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

५० टक्‍के तफावत तरीही मोदी सरकारकडून दरवाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या युपीए सरकारच्या काळातील किंमती व सध्याच्या सरकारच्या काळातील किंमतीशी तुलना करता जवळपास ५० टक्के एवढ्या कमी असतांनाही मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. यामुळे इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतांनाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करतांना दिसत नाही. तरी केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेल, गॅसची दरवाढ कमी करुन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन कॉँग्रेस पक्षाच्यावतीने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, कार्याध्यक्ष दिपक साळुंके, जि.प. सदस्य धीरज अहिरे, माजी जि.प.सदस्य रमेश अहिरराव, गणेश गावित, उद्योजक प्रवीण चौरे, रमेश गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य धुडकू भारुड आदी काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image