esakal | धुळ्यात मंगल कार्यालय, हॉटेलचालकांना नोटीसा 
sakal

बोलून बातमी शोधा

corona marriage

राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना उपाययोजना, कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनाकडून नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

धुळ्यात मंगल कार्यालय, हॉटेलचालकांना नोटीसा 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रातील मंगल कार्यालये, लॉन्स, उपाहारगृह, बार, हॉटेल, रेस्टॉरंटचालकांना उपाययोजना व दक्षतेच्या अनुषंगाने नोटिसा बजावण्यात येत आहेत. मोहाडी पोलिसांनी अशा देण्यास प्रारंभ केला असून महापालिकेकडूनही अशी कार्यवाही करण्यात येत आहे. 

राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना उपाययोजना, कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनाकडून नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मोहाडी पोलिसांकडून त्यांच्या हद्दीतील मंगल कार्यालये, लॉन्स, उपाहारगृह, बार, हॉटेल, रेस्टॉरंटचालकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा संसर्गामुळे बाधित व्यक्तींची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे नोटिशीत म्हटले आहे. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार आदी ५० टक्के क्षमतेसह सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू राहतील, लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्‍ती उपस्थित राहणार नाहीत, लग्न समारंभासाठी पोलीस स्टेशन, तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉल आदी ठिकाणी मास्कचा वापर न करणा-यांवर तसेच ५० पेक्षा जास्त व्यक्‍ती आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. 

कारवाईचा इशारा 
लग्न समारंभ, वाढदिवस कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल त्यामुळे याबाबत दक्षता घावी. तसेच धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे येथे गर्दी होणार नाही व फिजिकल डिस्टन्सींग राखणे आवश्‍यक आहे. मास्कु, सॅनिटायझर चा वापर करणे बंधनकारक राहील. शाळा, महाविद्यालयांच्या ठिकाणीही फिजिकल डिस्टन्स राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. या आदेशांचे आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असा इशाराही नोटिशीतून दिला आहे. दरम्यान, अशा नोटिसा महापालिकेकडूनही देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image