esakal | उसनवारीचे ३१० रेमडेसिव्हिर चुकती 

बोलून बातमी शोधा

remdesivir

राज्य शासनाच्या निर्णयानुसार एकाचवेळी पाचशे इंजेक्शन वाटप करता येतात. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४८० इंजेक्शनचा साठा येथे प्राप्त झाला. त्यातून सिव्हिल हॉस्पिटलने धुळे आयएमए आणि दोंडाईचा आयएमएला उसनवार दिलेल्या एकूण २०० इंजेक्शनची परतफेड केली.

उसनवारीचे ३१० रेमडेसिव्हिर चुकती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून सोमवारी (ता. १२) धुळे जिल्ह्याला ४८०, तर इतर कंपन्यांकडून २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. त्यात ४८० पैकी ३१० इंजेक्शनने शासकीय रुग्णालयांची उधारी चुकती केली, तर उर्वरित १७० इंजेक्शनचे वाटप झाले. तसेच रात्री उशिरापर्यंत कंपन्यांकडून प्राप्त २०० इंजेक्शनच्या साठा वाटपाचे नियोजन सुरू होते. 
डॉ. भामरे यांनी हैदराबाद येथील हेट्रो कंपनीकडून पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मंजूर करून घेतले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार एकाचवेळी पाचशे इंजेक्शन वाटप करता येतात. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४८० इंजेक्शनचा साठा येथे प्राप्त झाला. त्यातून सिव्हिल हॉस्पिटलने धुळे आयएमए आणि दोंडाईचा आयएमएला उसनवार दिलेल्या एकूण २०० इंजेक्शनची परतफेड केली. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून उसनवार घेतलेले ५० इंजेक्शन परत केले. याशिवाय हिरे मेडिकल कॉलेजला ६० इंजेक्शन दिले. याप्रमाणे ४८० मधून ३१० इंजेक्शन या सरकारी रुग्णालयांना दिले गेले. 

१७० इंजेक्‍शनचे वाटप
उर्वरित १७० इंजेक्शनचे शहरासह जिल्ह्यात घोषित कोविड केअर रुग्णालयांना ऑक्सिजन बेडची संख्या लक्षात घेऊन वाटप केले. विविध कंपन्यांकडून शहरातील युनिक, युनिक कार्पोरेशन, शक्ती, राजा आदी वितरकांना निरनिराळ्या संख्येत २०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. तो साठा वाटपाचे नियोजन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

टॉसिलिझुमॅब इंजेक्शन संपले 
जिल्ह्यात टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा साठाही संपला असून, त्याची मागणी आजही कायम आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून काय प्रयत्न होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.