esakal | पुण्यात चोरले एटीएम अन्‌ जिल्ह्याची यंत्रणा कामाला
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule police

पुण्यात चोरले एटीएम अन्‌ जिल्ह्याची यंत्रणा कामाला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिरपूर (धुळे) : भोसरी (जि. पुणे) येथील एटीएम चोरी (ATM machine robbery case bhosari pune) प्रकरणातील संशयितांचे वाहन धुळेमार्गे जात असल्याचा संदेश प्राप्त झाला आणि जिल्ह्याची पोलिस यंत्रणा कामाला लागली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai agra highway) धुळ्यापासून ते थेट सांगवीपर्यंत पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली. टोलनाक्यांवर पथकांनी दिलेले संदेश, जीपीएस ट्रॅकिंग यांच्या मदतीने सावळदे (ता. शिरपूर) येथे संशयित वाहन थांबविण्यात आले. मात्र, एटीएम मशिन आढळले नाही. पोलिसांनी (Dhule police) संशयावरून दोन जणांना ताब्यात घेतले. (crime-news-pune-bhosri-aria-atm-machine-robbery-and-shirpur-police-search)

भोसरी येथे बुधवारी (ता. ९) एटीएम मशिन पळवून नेल्याची घटना घडली. एटीएममध्ये २५ लाखांची रोकड होती. घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून तेथे एक कंटेनर असल्याचे दिसून आले. संशयितांनी एटीएम मशिन कंटेनरमध्ये टाकून पळविण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून चिंचवड पोलिसांनी सर्वत्र संदेश जारी केले. त्यात संबंधित कंटेनर महामार्गावरून मध्य प्रदेशमार्गे नेण्यात येत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून धुळे, सोनगीर, नरडाणा, शिरपूर शहर आणि सांगवी पोलिस ठाण्याच्या पथकांनी महामार्गावर ठाण मांडले.

हेही वाचा: उद्धव ठाकरे सरकारचे मॉडेल प्रशंसनीय !

जीपीएसच्या माध्‍यमातून मागोवा

संशयित कंटेनरचा जीपीएसच्या माध्यमातून मागोवा सुरू होता. दुपारी सोनगीर टोल प्लाझा ओलांडून संशयित वाहन निघाल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, नरडाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे सावळदे (ता. शिरपूर) येथे पोचले. त्यांनी संबंधित कंटेनर (एचआर ४७, बी ७४६१) ताब्यात घेतला. कंटेनरमध्ये एटीएम मशिन असल्याच्या संशयावरून शहर पोलिस ठाण्यात आणून त्यातील माल उपसण्यात आला. मारुती कंपनीच्या वाहनांचे सुटे भाग असलेली खोकी बाहेर काढल्यानंतरही मशिन किंवा रोकड आढळली नाही.

महामार्गावर बंदोबस्‍त

दरम्यान, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन वाहनाची पाहणी केली. संशयित चालक पवन कंवरलाल चव्हाण, सहचालक पवन शिवयोगी (दोघे रा. डाबली कला, ता. खिलजीपूर, जि. राजगड, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर महामार्गावर पुन्हा बंदोबस्त तैनात करण्यात आला.