एकेकाळी चिलाणे गाव होते दुष्काळी; तेथीलच पपई चालली राज्याबाहेर..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून दिल्या. त्यातून उत्पन्न कमावून काही शेतकऱ्यांनी तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे काम झाल्यामुळे तापीत असलेले पाणी पाईपलाईनने आपल्या शेतापर्यंत आणले आणि पुर्ण बागायत करू लागले. 

दोंडाईचा (धुळे) : चिलाणे (ता. शिंदखेडा) येथे एकेकाळी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. त्या गावात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर करून शेतकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविल्यानंतर आमदारांनी शेतीसाठी सिंचनाच्या पाण्यासाठी प्रयत्न केलेत. यामुळेच आता तेथील पपई परराज्‍यात जात आहे.

रोहयो मंत्री असतांना रावल यांनी 'सिंचन विहिरीचा पायलट प्रोजेक्ट' राबविला होता. त्याअंतर्गत शिंदखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली. चिलाणे गावातही अनेक शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून दिल्या. त्यातून उत्पन्न कमावून काही शेतकऱ्यांनी तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे काम झाल्यामुळे तापीत असलेले पाणी पाईपलाईनने आपल्या शेतापर्यंत आणले आणि पुर्ण बागायत करू लागले. 

पपई लावगड केली आणि
गावातील एक युवा शेतकरी प्रवीण याने आपल्या शेतात पपईची लागवड केली. मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यामुळे पिकवलेली पपई आज अहमदाबाद, बॅंगलोर याठिकाणी जात आहे. त्यांना त्याचा मोठा भाव मिळत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. आमदार जयकुमार रावल हे कामानिमित्त शिंदखेडाकडे जात असतांना त्यांनी शेतीला भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news dondaicha chilane village papaya transport other state market