esakal | शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतताच पोलिसांनी घेतले ताब्‍यात; तिकडे सुरू झाले महिलांचे रास्‍ता रोको
sakal

बोलून बातमी शोधा

farmer strike

शासन व प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ येथील शेतकऱ्यानी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने मोठी धावपळ करत आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर शेतकरी महिलांनी रस्ता रोको

शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतताच पोलिसांनी घेतले ताब्‍यात; तिकडे सुरू झाले महिलांचे रास्‍ता रोको

sakal_logo
By
रणजित राजपूत

दोंडाईचा (धुळे) : विखरण (ता.शिंदखेडा) येथील रद्द झालेल्या औष्‍णिक वीज प्रकल्पासाठी महाजनकोने घेतलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर लावण्यात आलेले कलम चार (एक)ची नोंद रद्द करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ येथील शेतकऱ्यानी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने मोठी धावपळ करत आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर शेतकरी महिलांनी रस्ता रोको आंदोलन उभे केल्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण झाले होते. 

शेतकऱ्यांनी आत्‍मदहनाचा इशारा दिला होता. त्‍यानुसार शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केल्‍यानंतर पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनील माने, अप्पर तहसिलदार सुदाम महाजन दाखल झाल्याने आंदोलकांशी चर्चा करुन त्यांच्या भावना तत्परतेने शासनाकडे पोहचवण्याचे आश्वासन देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

इतर व्यवहार करणेही शक्‍य नाही
विखरण येथील औष्णिक प्रकल्पासाठी काही शेतकऱ्याच्या शेतजमीनी खरेदी केल्या होत्या. परंतु १३० शेतकऱ्यांनी जमीन विक्रीस विरोध केला असतांनाही त्यांच्या जमीनीच्या सातबाऱ्यावरील चार एकचे कलम रद्द करण्याची वांरवार त्या शेतकऱ्यांनी शासनाकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली. परंतु शासनाकडून सतत दूर्लक्ष होऊन जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे. तसेच सदर प्रकल्प रद्द झाला आहे. तरी उताऱ्यावरील नोंद काढत नसल्याने शेतकऱ्याना आपल्या जमिनीचे इतरत्र व्यवहार करता येत नाही. बँकेकडूनही कर्जपूरवठा मिळत नाही. अशा अनेक अडचणींना शेतकऱ्याना सामोरे जावे लागत आहे.

अन्‌ शेतकऱ्यांनी टाकले पेट्रोल
विखरण ग्रामपंचायतीसमोर प्रजासताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असतांनाही उताऱ्यावरील चार एकची कलम
काढले जाण्याचे संबधीताकडून उत्‍तर न मिळाल्यामूळे किशोर पाटील, सर्जेराव पाटील, सचिन पाटील, नथा शिंदे, विजय पाटील, सदाशिव पाटील, जगन्नाथ पाटील यांनी अंगावर पेट्रोल टाकून आंदोलनस्थळी हजर झाले. तेव्हा पोलीस प्रशासनाने आत्मदहन करणाऱ्याना ताब्यात घेतले.

तिकडे महिलांचे रास्‍ता रोको
आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले असतांना त्यांच्या परिवारातील महिलांसह ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. यावेळी धूळे जिल्हा शिवसेना उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे, धूळे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य आबा मुंडे, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामसिंग गिरासे यांनी आंदोलनात सहभाग घेतल्यामूळे दोंडाईचा धूळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने हतबल पोलीस प्रशानाने वरीष्ठांना घटनेचे गांभीर्य कळविल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनील माने, अप्पर तहसिलदार महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढून त्‍यांच्या भावना व मागणी शासन दरबारी कळविण्याचे आश्वासन दिले, त्यामूळे महिलांनी आंदोलन तूर्त मागे घेतले

संपादन ः राजेश सोनवणे