
खरीपात सलग तीन महिने पाऊस झाला. शिवारातील सर्वच भाजीपाला सडला. उत्पादन हाती नसल्याने भाव अव्वाच्या सव्वा वाढला. आता उत्पादन बेतानेच निघत आहे. मात्र सलग आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.
कापडणे (धुळे) : गेल्या महिनाभरापासून मेथी व कोथिंबीरीला भाव नाही. आता या यादीत फ्लॉवरही आली आहे. अवघी दोन ते तीन रूपये प्रती किलोने व्यापारी खरेदी करीत आहेत. काढणीचा खर्चही निघत नसल्याने काढलेली फ्लॉवर बाजारात न नेता थेट नाल्यातच फेकत आहेत. माल पिकवूनही शेतकऱ्याची किती वाईट अवस्था आहे. याकडे शासन बघेल का अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
यावर्षी खरीपात सलग तीन महिने पाऊस झाला. शिवारातील सर्वच भाजीपाला सडला. उत्पादन हाती नसल्याने भाव अव्वाच्या सव्वा वाढला. आता उत्पादन बेतानेच निघत आहे. मात्र सलग आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.
किरकोळ विक्रीलाही भाव नाही
कापडणे परीसरात शंभरावर शेतकरी फ्लॉवरचे उत्पादन घेतात. फ्लॉवरला शहादा, मालेगाव, शेंदावा, धुळे व सुरतच्या बाजारात मोठी मागणी आहे. तरीही भाव कोसळले आहेत. प्रती किलो दोन व तीन रूपयाचा भाव मिळत आहे. तर गल्ली बोळातील विक्रेते दीड दोन किलोचा फ्लॉवर गड्डा अवघ्या दहामध्ये देत आहेत. भाजीपाल्याचे भाव कोसळतच असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
फ्लॉवर मातीत आणि नाल्यात
दरम्यान अधिकार माळी यांनी फ्लॉवरवर रोटा फिरवीला. भाव पडल्याने सुरेश माळी, अधिकार माळी, सुदाम माळी, सुनील माळी, राजेंद्र माळी, दगा मोरे, संजय माळी आदी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या बाबतीत दोन मतप्रवाह आहेत. अधिकाधिक मतप्रवाह शेतकऱ्यांचे आहेत. दिल्लीत दोन राज्याचे शेतकरी एकवटलेत पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांनी एकदिवशीय पाठिंबा देवून काय साध्य केले अनुत्तरीत प्रश्न आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र यावर्षी अती पावसाने व भावच नसल्याने ठार मेले आहेत. याकडे कुणी बघेल का?
- महेंद्र प्रकाश पाटील, युवा शेतकरी
संपादन ः राजेश सोनवणे