अतिवृष्‍टीची भरपाई; शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हात

विजयसिंग गिरासे
Saturday, 16 January 2021

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी भरपाईची राज्य शासनाने 9 नोव्हेंबर 2020 निर्णय घेण्यात आला होता.

चिमठाणे (धुळे) : जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या धुळे जिल्ह्यातील चार ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दुसरा हप्ता वितरीत केला. यात साधारण तीन कोटी 32 लाख 66 हजार रूपयांचा निधी वितरित केला आहे. यापूर्वी पहिल्या हप्त्यात जिल्हयाला सात कोटी 16 लाख 60 हजार रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. असा एकूण दहा कोटी 40 लाख 26 हजार रक्कम जिल्‍ह्‍याला मिळाली आहे. 
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी भरपाईची राज्य शासनाने 9 नोव्हेंबर 2020 निर्णय घेण्यात आला होता. यात जिरायत व बहुवाषिॅक पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या जिरायती शेतकऱ्यांना दहा हजार रूपये प्रति हेक्टर व बहुवाषिॅक फळबागेसाठी 25 हजार रूपये प्रति हेक्टर या निकषाने दोन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचे निश्चीत केली होती. 

पंचनाम्‍यानुसार मदतीचे वाटप
कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांनी सयुक्त पंचनाम्यानुसार सादर केलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप तहसीलदार यांनी करावे. बॅकांनी मदतीची रक्कम थेट बचत खात्यात जमा करण्यात यावी. मदत ही रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत देता येणार नाही. शेत जमिनीची नुकसानाची रक्कम बँकेने कोणत्या प्रकारची वसुली करू नये. यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी योग्य ते निर्गमित करावे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची आदर्श आचार संहिता लागू आहे. राज्य निवडणूक आयोगाने 18 डिसेंबर 2020 आदेशान्वये मदतीचे वाटप करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. मदतीचे वाटप करतांना आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी. 

जिल्ह्यात पहिला व दुसरा हप्ता वितरित 

तालुका... पहिला हप्ता... दुसरा हप्ता (रक्कम लाखात)
धुळे…... 8.10576... 3.90773
साक्री.... 357.21032... 255.71795 
शिरपूर... 150.90591... 52.73636 
शिंदखेडा.. 200.37801.. 20.29796
एकूण….. 716.60000....332.66000 

संपादनः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news farmer heavy rain cover second time funding