esakal | धुळ्याच्या सीबीएसई स्कूलला प्रथम मानांकन 
sakal

बोलून बातमी शोधा

cbsc school dhule

एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग्जतर्फे जागतिक स्तरावर व्यापक स्वरूपात, विश्वसनीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येते. गेल्या दशकातील शैक्षणिक संस्थांना रेटिंग देण्यात ही संस्था सर्वात विश्वसनीय म्हणून ओळखली जाते.

धुळ्याच्या सीबीएसई स्कूलला प्रथम मानांकन 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग्जतर्फे धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या सीबीएसई स्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन देऊन गौरविण्यात आले. या बहुमानामुळे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कार्याची विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रशंसा केली जात आहे. 
शालेय अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, तसेच ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे आणि शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील सुलभ अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, शाळेत उपलब्ध अतिशय उच्चतम दर्जेदार सोयी-सुविधा या निकषांवर सरस ठरल्यामुळे शाळेला हा सन्मान प्राप्त झाला.  

असे मिळाले मानांकन
एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग्जतर्फे जागतिक स्तरावर व्यापक स्वरूपात, विश्वसनीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येते. गेल्या दशकातील शैक्षणिक संस्थांना रेटिंग देण्यात ही संस्था सर्वात विश्वसनीय म्हणून ओळखली जाते. या सर्वेक्षणानुसार पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील ११ हजारांहून अधिक मुलाखतींवर आधारित मानांकन दिले जाते. शैक्षणिक दर्जा, शिक्षक कार्यक्षमता, नेतृत्व गुणवत्ता, क्रीडाशिक्षण आणि इतर विविध मानदंडांवर देशातील सर्वांत सरस ठरलेल्या दोन शाळांना मानांकन देण्यात आले. त्यात धुळे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची शाळा एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलला मानांकन प्रदान करण्यात आले. 

५० वरून ६४० विद्यार्थी
श्री. विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी २६ जुलै २०१६ ला धुळे येथे एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलची स्थापना केली. शाळेची सुरवात प्री-प्रायमरी विभागापासून करण्यात आली. २०१६ मध्ये ५० विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या शाळेत आजमितीस नर्सरी ते नववी या वर्गात एकूण ६४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या बहुमानाबद्दल मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांचे संस्थाध्यक्ष अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, गिरिजा मोहन व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image